Vasant More | पुण्यातील कल्याणीनगर भागात नुकताच मोठा अपघात झाला. या घटनेची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातात दोघेजण हे आयटी क्षेत्रात काम करणारे होते. एका वेदांत नावाच्या अल्पवयीन मुलाने त्या दोघांना आपल्या महागड्या पोर्श चारचाकी वाहनाखाली चिरडलं.
वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवालला संभाजीनगर येथून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात येऊन गेले होते. मात्र त्यानंतर काँग्रेस पक्षाचे रवींद्र धंगेकर यांनी हे सर्व दिखावा आहे. यामध्ये कोणतीही कारवाई केली गेली नसल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे.
रवींद्र धंगेकर यांच्या आरोपानंतर आता पुण्यामध्ये भाजपचे नेते आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्यारोप केला ते म्हणाले की, लोकं तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता. ते आताच्या निवडणुकीत पाहिलं आहे आणि तेच संवेदनशील प्रकरणातही तेच आहे, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत. त्यानंतर आता पुण्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी देखील याप्रकरणावर भाष्य करत सवाल केला आहे.
“तरूण पिढी नारळ पाणी पिण्यासाठी जाते का?”
कोरेगाव पार्क येथे जो अपघात झाला तो दुर्देवी होता. पण त्यामागून जे काही राजकारण सुरू आहे पुण्यातील काही नेत्यांची कीव येते असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्कमध्येच आहे का? ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या, कोथरूडमध्येही काहींनी नाईट लाईफबाबत लक्ष द्यावं, असं वसंत मोरे (Vasant More) यांनी म्हटलं आहे.
“यासोबतच भुगाव, पिरंगुट या भागामध्ये म्हणजेच मुळशीकडे लक्ष द्यावे. तसेच ज्यांनी निवेदनं दिली त्यांनी सुद्धा कोंढवा भागाकडे लक्ष द्यावं. कोरेगाव पार्कमध्ये जाणारी तरूण पिढी दारू पिण्यासाठी जाते आणि वरील भागांमध्ये लाईफसाठी जाणारी तरूण पिढी नारळाचे पाणी पिण्यासाठी जाते का?”, असं वसंत मोरे (Vasant More) म्हणाले आहेत.
“भविष्यात जागेवर जात लाईव्ह केलं जाईल”
कोणाकोणाचे कुठेकुठे नाईटलाईफसाठी धारेदोरे आहेत. अशा ठिकाणी भविष्यात जागेवर जाऊन लाईव्ह केलं जाईल. पोलीस यंत्रणेने फक्त कोरेगाव पार्क टार्गेट न करता संपूर्ण शहरसुद्धा टार्गेट करावे. जर कुठे काही झालं तर भ्रष्ट यंत्रणा जबाबदार असेल”, असा वसंत मोरे (Vasant More) यांनी इशारा दिला आहे.
News Title – Vasant More Statement About Pune Accident Issue
महत्त्वाच्या बातम्या
शरद पवारांना लागली बारामतीमधील विजयाची चाहुल; केलं मोठं वक्तव्य
बापरे! साड्यांच्या किंमती वाढल्या; मोजावे लागणार ‘इतके’ जास्त पैसे
आरसीबीने दिनेश कार्तिकला दिला खास निरोप; भावुक व्हिडिओ व्हायरल
काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला! ‘या’ आमदाराचे निधन
पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठं वळण; कोर्टाने दिला मोठा निर्णय