Vasant More | मनसे पक्षाला राम राम करत वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे पुणे लोकसभा निवडणुकीत वसंत मोरेंना (Vasant More) उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसमधून रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीतून वसंत मोरेंना (Vasant More) उमेदवारी देण्यात आली होती. मात्र पुणे लोकसभा निवडणुकीत वसंत मोरेंचं (Vasant More) डिपॉझिट जप्त झालं. अशातच आता वसंत मोरेंच्या 100 गाड्यांचा ताफा हा मुंबईकडे वळाला आहे.
शिवसेना ठाकरे गटात काय जबाबदारी?
वसंत मोरे (Vasant More) लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. या गटात त्यांच्याकडे कोणती जबाबदारी असणार आहे याबद्दल त्यांनी भाष्य केलं आहे. पुण्याहून मुंबईकडे जात असताना वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला कोणता शब्द देण्यात आला होता का? असं विचारण्यात आलं होतं. त्यावेळी वसंत मोरे उत्तरले, “मी कोणताही शब्द दिलेला नाही. मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मार्गदर्शन संजय राऊत, आदित्य ठाकरे जी जबाबदारी देतील ती मी पार पाडेल,” असं वसंत मोरे म्हणाले.
वसंत मोरेंसोबत 17 शाखाध्यक्ष, 5 उपविभागाध्यक्ष, 1 शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, माथाडी कामगार ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की, पक्षात ज्यांना राहायचं आहे ते राहू शकता. मात्र सर्व आपल्या मर्जीने ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. कारण पक्षात ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे. त्यामुळे सर्वच ठाकरे गटात प्रवेश करत आहेत.
वसंत मोरेंनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला राम राम केला. त्यानंतर वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश केला होता. मात्र पुणे लोकसभा निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. मात्र अशातच आता ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांनी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा कौल जाणून घेतला.
“सुरूवातीपासून शिवसेनेचा कार्यकर्ता”
मी सुरूवातीपासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी आग्रहाखातर शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश करत आहे, असं वसंत मोरे म्हणाले होते. मात्र आता वसंत मोरे यांच्यावर कोणती जबाबदारी दिली जाईल हे पाहणं गरजेचं असणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता महाविकास आघाडीने मोठी भरारी घेतली आहे. याचाच फायदा आता विधानसभेसाठी होऊ शकतो. याचा फायदा वसंत मोरेंना राजकीयदृष्ट्या होऊ शकतो.
News Title – Vasant More Talk About His Responsibility Shivsena Thackeray Group
महत्त्वाच्या बातम्या
शरद पवारांनी पहिला उमेदवार केला जाहीर; ‘हा’ 25 वर्षीय तरुण उतरणार रिंगणात
सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट जारी
मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्ट्या जाहीर, पाहा कुठे कुठे असणार सुट्ट्या
आजपासून ‘या’ राशीधारकांचा सुवर्णकाळ सुरु; नशीब चमकणार
‘अशा’ व्यक्तींपासून होईल तितकं दूर राहा; आयुष्यात सुख-समृद्धी चालून येईल