वसंत मोरेंना बसायला जागाच दिली नाही, वाचा नेमकं काय घडलं?

पुणे | अभिनेते अशोक सराफ यांच्या 75 व्या जन्मदिनानिमित्त तीन दिवसीय ‘अशोक पर्व’ या कार्यक्रमाचे कोथरूडमध्ये आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी राज ठाकरे यांचं भाषण देखील झालं. या कार्यकर्माला पुण्यातील रसिकांसह मनसेचे शहरातील अनेक नेते देखील उपस्थित होते. यावेळी मनसे नेते वसंत मोरे देखील उपस्थित होते.

मनसेचे फायर ब्रॅंड नेते वसंत मोरे (Vasant More) यांना हा कार्यक्रम उभ्याने बघावा लागला. यामुळे राज ठाकरे त्यांना वारंवार डावलत आहेत का?, अशा चर्चा सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

वसंत मोरे त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते होते. वसंत मोरे ज्या ठिकाणी उभे होते त्याच ठिकाणी अनेक पदाधिकारी बसून होते. मात्र एकाही पदाधिकाऱ्याने वसंत मोरे यांना बसायला जागा दिली नसल्याची माहिती आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-