वसंत मोरे ठाकरेंच्या वाटेवर?, ‘मातोश्री’वर आज घेणार उद्धव ठाकरेंची भेट

Vasant More | मनसेचे माजी नेते वसंत मोरे हे लोकसभा निवडणुकीत उभे राहिले होते. वंचित बहुजन आघाडी कडून त्यांना उमेदवारी मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत मोरे यांना उमेदवारी मिळाली. मात्र, त्यांना निवडणुकीत पुणेकरांकडून म्हणावी तशी साथ मिळाली नाही.

वसंत मोरे हे पुणे लोकसभा निवडणुकीत उभे राहिले होते. मात्र, त्यांना पडलेली मते तेव्हा खूपच चर्चेत आली होती. वसंत मोरे यांना फक्त 9 हजार मते मिळाली होती. पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला. यानंतर वसंत मोरे आता पुन्हा चर्चेत आले आहेत.

वसंत मोरे उद्धव ठाकरेंची भेट घेणार

राजकीय वर्तुळात सध्या वसंत मोरे पुन्हा ठाकरेंच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगत आहेत. मात्र, यावेळी मोरे राज ठाकरे नाही तर उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. वसंत मोरे (Vasant More) आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत.

मातोश्रीवर आज (4 जुलै) दुपारी साडेबारा वाजता वसंत मोरे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती समोर येत आहे. वसंत मोरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते हेसुद्धा मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती आहे.

वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार?

लोकसभा निवडणुकी दरम्यान आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी वसंत मोरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली होती. मात्र महाविकास आघाडीने काँग्रेसला ही जागा दिल्याने येथे कॉँग्रेसचा उमेदवार उभा राहिला. त्यामुळे वसंत मोरे यांना उमेदवारी मिळू शकली नाही.

त्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली. यात त्यांचा दारुण पराभव झाला. अशात आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता वसंत मोरे (Vasant More) शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आजच्या भेटीकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

News Title- Vasant More will meet Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या-

ललित पाटील ड्रग्स प्रकरणी मोठी अपडेट समोर!

पावसाळ्यात चिकन-मटण खाताय?, मग ही बातमी वाचाच!

वाहनचालकांना दिलासा! ‘या’ शहरांत पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

अजित पवारांना धक्का! तब्बल ‘इतके’ नेते शरद पवारांच्या संपर्कात?

गुड न्यूज! आज स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या 10 ग्रॅमचे दर