अजित पवारांनी दिलेल्या ऑफरवर वसंत मोरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी वसंत मोरे यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. ज्यावर खुद्द वसंत मोरे यांनी स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

 अजित दादा स्वत:हून माझ्याकडे आले आणि म्हणाले तात्या या आम्ही वाट बघतोय तुमची. यानंतर पुन्हा आम्हा दोघांची भेट झाली, त्यावेळीही अजित पवार म्हणाले की, वसंतराव या बरं का वाट बघतोय, अशी माहिती वसंत मोरे यांनी दिली आहे.

पक्ष वाढीची कोणताही भूमिका नाही, पक्षातील लोक कमी कसे होती याकडे यांचं अधिक लक्ष आहे. मला या लोकांची लाज वाटते. कारण माझ्या वाढदिवसाला कमीतकमी लोक कसे येतील याची जर ही लोक वाट पाहत असतील तर यांना पद कशासाठी दिलीत असा प्रश्न पडतो, असं वसंत मोरे म्हणालेत.

मागील काही दिवसांपासून वसंत मोरे हे महाराष्ट्क नवनिर्माण सेनेवर नाराज होते. त्यामुळे तडफदार नेते काही दिवसांपासून दुसऱ्या पक्षात जाणार अशी चर्चा होती. त्यामुळे वसंत मोरे हे मनसेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत प्रवेश घेणार असल्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सगळ्या पक्षाकडून सुरु झाली आहे. त्यात मनसेकडूनही पुणे जिल्हातील गावागावात पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. त्याची जबाबदारी वसंत मोरे यांना देण्यात आली आहे. त्यामुळे जर वसंत मोरे राष्ट्रवादीत गेले तर पुण्यात मनसे खिळखिळी होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-