Top News कोल्हापूर महाराष्ट्र

‘आई गेल्याचं दुःख बाजूला सारत त्यांनी सामाजिक कार्याचा वसा घेतला’; राजू शेट्टींनी केला सलाम

कोल्हापूर | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाहूवाडी-पन्हाळा मतदार संघ प्रमुख वसंत पाटील यांचं राजू शेट्टी यांनी तोंडभरून कौतुक केलंय. राजू शेट्टी यांनी या सदर्भात एक फेसबुक पोस्ट केलीये.

वसंत पाटील हे 1998 साली भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाले आणि साधारण 2008 पासून संघटनेत सक्रिय होऊन सामाजिक कामात अग्रेसर झाले. मात्र गेल्या आठवड्यात त्यांचा कोरोना या संसर्गजन्य आजाराचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. तर 21 तारखेला आईचे वृध्दापकाळाने निधन झालं. कोरोनाचे उपचार घेत असताना आपली आई गेल्याचं अतिव दुःख हदयात असताना सुध्दा त्यांनी समाजकार्य सोडलं नाही. सैनिकीवृत्ती मनामध्ये ठेवत आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो याच भावनेने त्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी कोरोनाचे उपचार घेत असताना स्वच्छता मोहीम राबवली आहे, असं राजू शेट्टी यांनी सांगितलंय.

वसंत पाटील ज्याठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपत निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करतात. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली. पाटील यांनी एन डी पाटील महाविद्यालयातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या खोल्या व पटांगण लोटलं, परिसरातील कचरा गोळा करणं, नवीन येणा-या कोरोना रुग्णांसाठी खोल्याची स्वच्छता करणं ही काम करत वयाच्या 60 व्या वर्षी आपण आजही देश सेवेचा वसा सोडलेला नाहीं हे सिद्ध केलंय, असं राजू शेट्टी म्हणालेत.

वसंत पाटील काही नातेवाईकांच्या संपर्कात आल्याने पॉझिटीव्ह आले. आईच्या निधनानंतर त्यांना तिस-या दिवशीच पॉझिटीव्ह आल्याने शाहूवाडी इथल्या एन डी पाटील कॉलेज, पेरीडमध्ये कोरोनावर उपचार घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘कोरोनावरची लस आली तरी…’; WHO प्रमुखांच्या वक्तव्यानं जगाचं टेन्शन वाढलं

रोहित पवारांचं अनोखं रक्षाबंधन, कोरोना वॉरियर्स बहिणींकडून बांधून घेतली राखी!

मनसेच्या अविनाश जाधवांना दिलासा नाहीच, जामीन अर्ज फेटाळला!

वर्दीतलं रक्षाबंधन…. ‘महिला कर्मचाऱ्यांचा मोठा भाऊ म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा!’

सम-विषम फॉर्म्युला बंद, मुंबई महापालिकेचा दुकानांनबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या