पुणे महाराष्ट्र

शरद पवार यांच्या सूचनेनंतर पुण्यातील वशाटोत्सव रद्द!

Photo Courtesy - Facebook/Sharad Pawar

पुणे | पुण्यातील वशाटोत्सव रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार होते.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे या नेत्यांची प्रमुख उपस्थिती राहणार होते. मात्र आता हा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय.

राज्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात वशाटोत्सवाचे आयोजन केलं होतं. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर त्यांच्याच सूचनेनुसार हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं वशाटोत्सवाच्या आयोजकांनी सांगितलं आहे.

राज्यात कोरोना संसर्ग वाढू लागला आहे. पुण्यातही कोरोनाचे रुग्ण बऱ्याच प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार वशाटोत्सव रद्द करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

“52 लोक शरद पवारांना सोडून गेले, एकही आमदार झाला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास”

“संजय राठोड सर्व मंत्र्यांच्या संपर्कात, योग्य वेळ येताच माध्यमांसमोर येतील”

मुंबई-पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची धक्कादायक नोंद, जाणून घ्या आजची आकडेवारी!

कोरोनामुळे ‘या’ शहरात पुन्हा कडक निर्बंध, अंत्यविधीला फक्त 20 जण तर हॉटेल्स…

राष्ट्रवादीचा ‘हा’ आमदार सरकारलाच नडला, गुन्हा दाखल झाला पण शिवजयंती साजरी केलीच!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या