Vastu Tips l अनेक वेळा आपण प्रयत्न करूनही घरात शांतता राहत नाही, आर्थिक अडचणी येतात किंवा झोप पूर्ण होत नाही. यामागे वास्तुदोष हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं. वास्तुशास्त्रानुसार, घरातील रचना, वस्तूंची दिशा आणि उर्जेचा प्रवाह हे जीवनातील सुख, समृद्धी आणि आरोग्यावर थेट परिणाम करतात. यासाठी काही सोपे पण प्रभावी वास्तू उपाय केले, तर तुमच्या घरात सकारात्मकता नक्कीच वाढेल.
मुख्य प्रवेशद्वाराची दिशा ठरवते घराचं भाग्य :
वास्तुशास्त्रात घराचा मुख्य दरवाजा उत्तर-पूर्व किंवा पूर्व-पश्चिम दिशेला असणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिशेला दरवाजा असल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि आर्थिक प्रगती होते. चुकीच्या दिशेला दरवाजा असल्यास घरात वाद, आर्थिक नुकसान आणि अशांतता वाढते.
घरातील तिजोरी किंवा लॉकर पश्चिम दिशेला ठेवणं सर्वात फायदेशीर मानलं जातं. यामुळे संपत्ती स्थिर राहते आणि अनावश्यक खर्च टाळता येतो. तिजोरी नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित असावी, ही लहानशी गोष्ट मोठा बदल घडवू शकते.
Vastu Tips l उत्तर दिशेला पाण्याचा फवारा :
घराच्या उत्तर दिशेला पाण्याचा फवारा ठेवल्यास धनाच्या देवतेचा म्हणजेच कुबेर देवांचा आशीर्वाद मिळतो. मात्र फवारा लाल रंगाचा नसावा, याची विशेष काळजी घ्यावी. यामुळे घरात धनप्राप्तीचे स्रोत वाढतात.
घरातील दक्षिण-पश्चिम दिशेला बेडरूम असल्यास कुटुंबातील संबंध मधुर राहतात. नात्यांमध्ये विश्वास आणि प्रेम वाढतं. जर ही दिशा शक्य नसेल, तर या दिशेला कुटुंबाचा एकत्र फोटो लावल्यास तसाच शुभ परिणाम मिळतो.
आरोग्यासाठी चांदीचा स्वस्तिक :
घरात सकारात्मक उर्जा वाढवण्यासाठी उत्तर-पूर्व दिशेला चांदीचा किंवा निळ्या रंगाचा स्वस्तिक लावावा. यामुळे घरात आरोग्यदायी वातावरण तयार होतं आणि रोग टळतात.
झोप नीट होत नसेल, मन अस्वस्थ वाटत असेल किंवा समाजात आपली ओळख वाढवायची असेल, तर तुमचा फोटो किंवा पलंग दक्षिण दिशेला ठेवा. दररोज या दिशेला तुपाचा दिवा एक तास लावल्यास झोपेची गुणवत्ता वाढते आणि मनःशांती मिळते.