बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वंचितला खिंडार; माजी आमदारासह 44 पदाधिकारी करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का बसला आहे. वंचितचे माजी आमदार आणि पक्षातील 44 पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समजत आहे.

माजी आमदार हरिदास भदे  आणि पदाधिकारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रावादीत प्रवेश करणार असल्याचं समजत आहे. 26 फेब्रुवारीला त्यांनी आणि इतर 45 पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे प्रकाश आंबेडकरांकडे पाठवले असल्याचं कळतंय.

प्रकाश आंबेडकर हे मनमानी करतात, सगळ्यांना सोबत घेत नाहीत, त्यांची कार्यशैली हुकुमशाही प्रवृत्तीची आहे, असे आरोप भदे यांनी केले. ता राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्यामुळे वंचितच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार मोहिम आखली असल्याची माहिती आहे.

दरम्यान, दलित आणि मुस्लिम मतदार हा वंचितच्या बाजूने झुकला होता. वंचितचे उमदवार जिंकले नसले तरी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पडतील एवढी मतं मिळवली होती.

ट्रेंडिंग बातम्या-

जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहिण पाहिजे पण…; जागतिक महिला दिनी अशोक चव्हाणांची कविता

येस बँकेकडून ग्राहकांना मोठा दिलासा; ट्विट करून दिली ‘ही’ माहिती

महत्वाच्या बातम्या-

अधुरी एक कहानी; ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत पाचव्यांदा जिंकला विश्वचषक

“कामगार प्रश्नांवर निर्णय घेण्याचा अधिकार कामगारमंत्र्यांना, आमदार-खासदारांना नाही”

“बारामतीकरांना बळी न पडता मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर-फलटण मार्गाला निधी द्यावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More