Top News

वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध; हा आहे मुख्य मुद्दा!

Loading...

मुंबई |  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाचा जाहीरनामा मुंबई कार्यालयात प्रसिद्ध केला आहे. आघाडीसोबत चर्चा न करता त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केल्याने ते स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

राज्यात वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यास पोलिसांची ड्युटी 8 तासांची करणार, हे प्रमुख आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरनाम्यात दिलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्र सरकारमध्ये कामगार मंत्री असताना त्यांनी पोलिसांना 8 तासांची ड्युटी असावी, असं मत मांडलं होतं. परंतू आजवर एकाही सरकारने त्यांचं मत विचारात घेतलं नाही, असं म्हणत त्यांनी आपण सत्तेवर आल्यास हे पहिलं काम करू, असं म्हटलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह राष्ट्रवादीला वंचित फॅक्टरचा जोरदार फटका बसला होता. आता विधानसभेलाही वंचित वेगळी चूल मांडून आघाडीला अडचणीत आणणार की झालं गेलं विसरून आघाडीत सामिल होणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-तुमची चूक नसेल आणि नोटीशीत काही तथ्य नसेल तर घाबरू नका- गिरीश महाजन

-पूरग्रस्तांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी महेश लांडगेंनी घेतला स्तुत्य निर्णय

-तिकीट नाकारलेल्या किरीट सोमय्यांकडे भाजपने सोपावली ही जबाबदारी!

-छोट्या दानवेंकडे भाजपने सोपवली ही मोठी जबाबदारी!

-मनसे नेते अनिल शिदोरेंचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप, म्हणतात..

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या