बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

क्रिकेट विश्वावर शोककळा! या भारतीय क्रिकेटपटूच्या आईपाठोपाठ बहिणीचाही झाला कोरोनाने मृ्त्यु

मुंबई | कोरोनाने सध्या थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेक राजकीय नेते, अभिनेते, व्यापारी यांचा कोरोनाने मृत्यु झाला. अशातच भारतीय महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू वेदा कृष्णमुर्तीच्या घरच्यांवरही कोरोनाने घावा घातला आहे.

वेदा कृष्णमुर्तीने कोरोनामुळे आपल्या आईला आणि बहिणीला गमावलं आहेे. दोन आठवड्यांपूर्वी कोरोनामुळेच तिच्या आईचंही निधन झालं होतं. मागील महिन्यात वत्सला शिवकुमार आणि आई चेलुवम्बदा देवी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु मागील आठवड्यात वेदाच्या आईचं निधन झालं होतं.

आई गेलेल्या दु:खातून वेदा सावरली नाही तर कोरोनाने वेदाची बहिण वत्सलालाही आपलं शिकार बनवलं आहे. कोरोनामुळे आज वत्सला शिवकुमारचाही मृत्यु झाला आहे. 24 एप्रिलला वेदाने आपल्या आईचं निधन झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली होती.

दरम्यान, आम्माच्या निधनानंतर तुम्ही केलेल्या सांत्वनाबद्दल मी आभारी आहे. आई शिवाय माझ्या कुटुंबाचा विचारही केला जाऊ शकत नाही, हे तुम्ही समजू शकता. तुम्ही माझ्या बहिणीसाठी प्रार्थना करा, माझा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. तुम्ही माझ्या प्रायव्हसीचा सन्मान कराल हीच अपेक्षा आहे. या परिस्थितीमधून जाणाऱ्या सर्वांबद्दल मला संवेदना आहे, असं वेदाने म्हटलं होतं. मात्र आता कोरोनाने बहिणीचाही मृत्यु झाल्यामुळे तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by IPL FANCLUB (@iplnewsupdate)

 

थोडक्यात बातम्या- 

भाजपने माजी खासदार संजय काकडे यांच्याकडे सोपवली ही मोठी जबाबदारी

“कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक घातक”

काय सांगता! हनीमूनच्या रात्री नवरदेवाला खोकणं पडलं महागात, नवरीने केलं असं की….

धक्कादायक! वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू, लेकीची जळत्या चितेत उडी

“आमच्यासोबत यावं अन् मराठा आरक्षणाच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More