नागपूर महाराष्ट्र

YCMOUच्या पुस्तकात सावरकरांचा दहशतवादी म्हणून उल्लेख

नागपूर | यशवतंराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कला शाखेतील द्वितीय वर्षाच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा दहशतवादी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्षेप घेतला आहे.

इतिहासाच्या पुस्तकात ‘दहशतवादी क्रांतीकारकांची चळवळ’ या धड्यात सावरकरांसह वासुदेव बळवंत फडके, रासबिहारी बोस, लाला हरदयाळ यांचाही उल्लेख दहशतवाही म्हणून केला गेला आहे.

क्रांतीकारकांची स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका आहे. त्यांचा अशा प्रकारे उल्लेख करणं चुकीचं आहे, हा धडा पुस्तकातून हटवण्यात यावा, अशी मागणी अभाविपने केली आहे.

दरम्यान, क्रांतीकारकांचा उल्लेख दहशतवादी म्हणून करण्याची आमची चूक झाली आहे, असं विद्यापीठाचे संचालक नारायण मेहरे यांनी मान्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-ममतांवर आरोप; शहांना पोहचली मानहानीची नोटीस

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांचे भारतातील कार्यक्रम बंद?

लाथ मारत बसल्याने उद्धव ठाकरेंचा एक पाय लांब झालाय- धनंजय मुंडे

-“पर्रिकर म्हणाले, माझा काहीही संबंध नाही, मोदींनीच ‘खेळ’ केला”

मुख्यमंत्री नव्हे तर माजी मुख्यमंत्री लोकायुक्ताच्या कक्षेत; अण्णांच्या मागणीला हरताळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या