बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’मधील वीरा साथीदार यांचं कोरोनामुळे निधन

नागपूर | प्रसिद्ध अभिनेते वीरा साथीदार यांचं नुकतंच कोरोनामुळे निधन झालं आहे. लेखक, कवी, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार म्हणूनही त्यांची ओळख होती. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट ‘कोर्ट’मध्ये नारायण कांबळे ही महत्त्वाची व्यक्तिरेखा त्यांनी साकारली होती. नागपूरच्या एम्समध्ये मंगळवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लेखक, कवी, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार म्हणूनही त्यांची ओळख होती. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने वीरा साथीदार यांना मागील आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज त्यांची प्राणज्योत मावळली. वीरा साथीदार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेशी अतिशय प्रभावित होते.

कोरोनामुळे त्यांचं निधन झाल्याचं वृत्त मला काही वेळापूर्वीच समजलं. ही बातमी समजल्यावर मला धक्का बसला. मला विश्वास बसत नाही. साथीदार अतिशय उत्तम व्यक्ती होते. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की कोर्ट चित्रपटात त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली, अशी प्रतिक्रिया कोर्ट चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हणे यांनी दिली आहे.

वीरा साथीदार यांनी दलित आणि मागासवर्गीयांमध्ये चेतना जागृत करण्यासाठी अनेक गीत रचली आणि गायली आहेत. ‘विद्रोही’ नावाच्या मासिकाचे संपादन केले. ‘रिपब्लिकन पँथर’ संघटनेच्या माध्यमातून ते वंचितांसाठी काम करत होते. कोर्ट चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर, परदेशी भाषा चित्रपट श्रेणीत भारताकडून तो ऑस्करसाठीही पाठवण्यात आला होता. त्यांच्या या जाणण्यानं वैचारिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी अन्…

चेपॅाकवर मुंबईच्या गोलंदाजांसमोर कोलकाताच्या फलंदाजांची परीक्षा

बंगाल निवडणूकीला नवं वळण; ममतांवर निवडणूक आयोगाची कारवाई

आता RT-PCR चाचणीत सापडेना कोरोना विषाणू; नव्या कोरोना स्ट्रेननं डाॅक्टराची वाढवली चिंता

महाराष्ट्रात लॉकडाऊन अटळ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं स्पष्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More