बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फळं आणि भाज्यांद्वारेही पसरु शकतो कोरोना; अशी घ्या काळजी

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने आजमितीस ४ लाखाहून अधिक नागरिकांचा बळी घेतला आहे. या व्हायरसची धास्ती अशी की, लोक कधी नव्हे इतके आरोग्याविषयी जागरूक झाले आहेत. अगदी खाण्यापिण्याच्या वस्तूही जंतूविरहीत करून वापरण्याची नवी पद्धतच रूजली आहे. काही ठिकाणी तर चक्क फळे व भाजीपाला सुद्धा साबण किंवा पावडरने स्वच्छ धुवून वापरला जात आहे.

मात्र असं करणं योग्य नसल्याचं नुकतंच एका संशोधनात समोर आलं आहे. आजतागायत अशी एकही केस आढळून आली नाही की, ज्यामध्ये कोरोना हा खाण्याच्या मार्फत पसरला जातो, असं ठामपणे सांगता येईल. भाजीपाला व फळांची खरेदी करताना मात्र बरीच काळजी घेणं गरजेची आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खाली दिलेल्या टिप्सचा वापर करून आपण स्वतःला कोरोना पासून दूर ठेऊ शकतो-

1. फळे किंवा भाजीपाला घरी आणल्यावर आपण आधी तो पाण्यातून स्वच्छ धुवून काढतो. मात्र याआधी आपला हात साबणाने स्वच्छ साफ करणं गरजेचं आहे. कोरोना विषाणू हा पृष्ठभागावर आढळून येत असतो. यासाठी किमान २० सेकंद आपला हात साबणाने स्वच्छ धुणं गरजेचं आहे.

2. बाजारातून फळे व भाजीपाला घरी आणल्यावर नळ चालू करून वाहत्या पाण्यात स्वच्छ करून ठेवावा. अन्न व औषध प्रशासनाच्या माहितीनुसार, फळे व भाजीपाला कापण्या किंवा चिरण्याआधी वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे. कारण सोलताना या फळांवरचे जीवाश्म आपल्या हाताला चिकटत नाहीत.

3. अन्न व औषध प्रशासनाच्या सल्ल्यानुसार, साबण, पावडर किंवा तत्सम प्रकारे भाजीपाला धुण्याची पद्धत चुकीची आहे. याऐवजी किचनच्या वाहत्या नळाखाली त्यांना रगडून साफ करणं, योग्य पर्याय आहे. फळे किंवा भाजीपाला पाण्याने स्वच्छ करतानाच भाजीचा खराब झालेला भाग काढून टाकणं सोयीस्कर ठरेल.

4. बटाटा, गाजर इ. जड भाज्यांना नळाखाली स्वच्छ करताना ब्रश किंवा स्पंजचा वापर करणं गरजेचा आहे. टरबूज, खरबूज किंवा तत्सम कठिण फळांना खाण्याआधी व्हेजीटेबल ब्रशच्या सहाय्याने साफ करण्याची सवय लावून घ्या.

 

5. भाजी बनवताना उकळण्याची क्रिया महत्वाची असते. कच्चा व पिकलेला भाजीपाला शक्यतो वेगवेगळा ठेवा. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, दररोज किमान ४० ग्रॅम भाजीपाल्याचा आहारात समावेश असणं गरजेचं आहे.

6. बाजारातून काही खाण्याची वस्तू किंवा पुडा घरी आणल्यास किमान ४ तास तो लांब सुरक्षित ठेवा. आपण फळे किंवा भाजीपाला यांना लगेच गरम पाण्यात बेकिंग सोडा टाकून ठेऊ शकतो. कारण सॅनिटायझरचा केवळ त्वचा, धातू किंवा स्टिलवरच परिणाम पडत असतो.

7. दुग्धजन्य पदार्थ उदा. दूध, दही, पनिर, चिज इ. पॅकेट खरेदी करून घरी आणल्यास उघड्यावर ठेवण्याची चूक करू नका. या प्रकारच्या पॅकेट्सला स्वच्छ धुवून त्वरित फ्रिजमध्ये ठेवा.

8. प्लास्टिक किंवा धातूच्या आवरणावर हा विषाणू ४८ तासांपर्यंत जीवंत राहू शकतो. यासाठी या आवरणाच्या वस्तू लागलीच फ्रीजमध्ये आणून ठेवण्याची चूक करू नका. या प्रकारच्या वस्तू रूममध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवुन मगच वापरात आणा.

ट्रेंडिंग बातम्या-

‘हवा तेज चल रही है उद्धवराव… खुर्सी संभालो’; ‘या’ भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला

…तर कोरोना चाचणी करण्याची गरज नाही- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून महाराष्ट्रात कोरोनाने हाहा:कार माजला- बबनराव लोणीकर

“गेली तीन महिने सतत काम करणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान”

राज्यपाल हे अत्यंत संवैधानिक पद, त्या पदाचा मान राखून बोललं पाहिजे- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More