Vegetable Price Hike | श्रावण महिना सुरू झाला आहे. या काळात उपवासांची सत्र सुरू होतात आणि मग अनेक घरांमध्ये उपवासाच्या फराळासाठीची लगबग सुरू होते. श्रावण महिन्यात मांसाहार टाळला जातो. जवळपास संपूर्ण श्रावण महिन्यात मांसाहार केला जात नाही. मग, अशा काळात पालेभाज्या, फळभाज्या याला मागणी वाढते. (Vegetable Price Hike)
सध्या श्रावण महिना सुरू असून अशावेळी भाज्यांचे दर हे गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वमान्यांचं बजेट कोलमडलं आहे. सणवारांच्या दिवसांमध्येच मागणी वाढल्यामुळं भेंडी, गवार, फ्लॉवर, वांगी, मटार यांसारख्या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.
पाले-भाज्यांचे दर वाढले
शेवगा, घेवड्याच्या दरात मात्र घट झाली असून, इतर फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पालेभाज्याचे दर घसरले आहेत. कांदापात, पुदिना, अंबाडी, चुका, राजगिऱ्याच्या दरात घट झाली आहे. तर, पावसाने जरा विश्रांती घेतल्याने पालेभाज्यांची आवक वाढली आहे.
कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, इंदूर, आग्रा, पुणे, सातारा येथून भाज्यांचे ट्रक दाखल झाल्याचे दिसून आले. सध्या बहुतांश भाज्या 40 रुपये प्रति किलोहून अधिकच्याच दरानं विक्री होत आहेत. नेहमी वातावरणात होणारे बदल, पावसाचे कमी-जास्त प्रमाण, ग्राहकांची मागणी याचा परिणाम हा भाजीपाल्याच्या आणि फळांच्या दरांवर होताना दिसत आहे. (Vegetable Price Hike)
आगामी काही दिवस भाज्यांचे दर हे असेच राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण श्रावण महिना हा सामान्यांना महागाईचा फटका देणार असल्याचं चित्र आहे. मागील दोन महिन्यात टोमॅटो देखील प्रचंड महागले होते. सध्या टोमॅटोचे भाव घसरले आहेत. मात्र, कांदा आणि लसूण अजूनही वरचढच असल्याचं चित्र आहे.
भाज्यांचे सध्याचे दर
पालेभाजी (दर (शेकडा)/ रुपये)
कोथिंबीर – 1000 ते 1500
मेथी – 800 ते 1500
शेपू – 800 ते 100
कांदापात – 800 ते 1200
पालक – 800 ते 1500
करडई – 400 ते 700 (Vegetable Price Hike)
News Title : Vegetable Price Hike
महत्त्वाच्या बातम्या-
“राहुल गांधी अत्यंत खतरनाक, विध्वंसक असून ते कधीच पंतप्रधान..”; कंगना रनौतचा संताप
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! अर्ज करण्यासाठी ‘या’ लिंकवर क्लिक करा
हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी ग्रुपच्या शेअर्सना मोठा झटका; कोट्यवधी रुपये बुडाले
वाहनचालकांना झटका! ‘या’ शहरांत पेट्रोल महागलं, जाणून घ्या आजचे दर
तुम्हीही कर्ज घेतले आहे का? तर CIBIL बाबतचा नवीन नियम नक्की जाणून घ्या