सामान्य माणसाने खायचं तरी काय?; भाजीपाल्यांचे दर भिडले गगनाला

Vegetable Price | भाजीपाल्यांचे दर वाढल्याने सध्या सामान्य माणसाने खायचे तरी काय?, असा प्रश्न पडला आहे. उन्हाचा तडाखा अन् अवकाळीमुळे पीक उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे ताज्या उत्पादनांची टंचाई निर्माण झाली आहे. या कारणाने, बाजारभावात प्रचंड वाढ होत चालली आहे.

काही आठवड्यापुर्वी शंभर रुपये किलो भावाने विकल्या जाणारया भाज्या आता थेट 200 रुपयेवर पोहोचल्या आहेत. राज्यात बदलत्या हवामानाचा पीकांवर गंभीर परिणाम झालाय.कडक उन्हामुळे भाजीपाल्याची नासाडीही भरपूर झाली आहे.

टोमॅटो, हिरवी मिरची आणि पालेभाज्या यांसारख्या भाज्या कापणीपूर्वीच कोमेजेत चालल्याचं चित्र आहे. घाऊक बाजारात देखील फळभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत असल्याने परराज्यातून फळभाज्यांची आवक करण्यात आली. परिणामी बहुतांश फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

भाजीपाल्यांचे दर वाढले

त्यातच नवीन लागवड करण्यासाठी अजून तरी एक ते (Vegetable Price Increased ) दीड महिन्याचा वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्या फळभाज्यांचे दर तेजीत राहणार असल्याचं म्हटलं जातंय. यामुळे सर्व सामान्य लोक खरेदी करताना आखडता हाथ घेत आहेत.

एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांमध्ये 50 टक्के घट झाली आहे. मुंबईच्या बाजारपेठेत दररोज 50 हजार टन भाजीपाल्याची आवश्यकता असते. उत्पादकता कमी झाल्यामुळे पुरवठा निम्म्यावर आला आहे. सध्या बाजारात 20 रुपये प्रति 250 ग्रॅमच्या खाली कोणतीही भाजी उपलब्ध नाही.

‘असे’ आहेत सध्याचे दर

सध्या बाजारात कांदे 50 ते 60 रुपये किलोने विकले जात आहेत. तर, कोथिंबीर सर्वात महाग झाली आहे. कोथिंबिरीच्या एका जुडीचे दर हे तब्बल 70 ते 80 रुपये झाले आहेत. भेंडी 120 ते 140 रुपये किलो, गवार 150 ते 160 रुपये किलो, फ्लाॅवर 100 ते 120 रुपये किलोने विकली जात आहे. तसंच टोमॅटो 50 रुपये प्रति 250 ग्रॅम दराने विकले जात (Vegetable Price) आहेत.यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला मोठी झळ बसली आहे.

News Title –  Vegetable Price Increased

महत्त्वाच्या बातम्या-

खासदार झाल्यानंतर कंगना रनौतने केली सर्वात मोठी घोषणा!

“तुला जिवंत राहायचं की नाही?”; नवनाथ वाघमारेंना जीवे मारण्याची धमकी

पुणे हिट अँड रन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर!

‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टीच्या खुलाश्याने सिनेसृष्टी हादरली!

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ‘या’ पदांसाठी भरती; 10 वी पासही करू शकतात अर्ज