बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गृहिणींचं बजेट मोडलं! ‘या’ भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ

मुंबई | कोरोना (Corona) काळात सर्वांनाच मोठा आर्थिक फटका बसला होता. अनेक उद्योगधंदे या काळात बंद पडले होते. कोरोनानंतर आता महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसत आहे. तसेच भाजीपालेच्या किंमती देखील प्रचंड वाढलेल्या पहायला मिळतंय. (Vegetable prices also rose sharply) अशातच आता पुन्हा भाजीपालेच्या किंमती वाढल्याने गृहिणींना मोठा फटका बसला आहे.

ऐन महागाईच्या तोंडवर आता भाजीपाल्याच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोच्या किंमती 80 ते 100 रूपये प्रतिकिलो झाल्या आहे. पुण्यात टोमॅटोचे दर 80 रूपये झाल्याचं दिसून आलं होतं. मात्र येत्या काळात टोमॅटोच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.

टोमॅटोबरोबरच वाटाण्याची किंमत देखील 100 रूपये प्रतिकिलोवर पोहचली आहे. तर कांदा देखील 30 रूपयांवर पोहचला आहे. सध्या बाजारात बटाट्याच्या किंमतीत देखील वाढ झाल्याचं दिसून येतंय. बटाट्याच्या किंमती 50 रूपयांपर्यंत गेल्याचं दिसतंय.

दरम्यान, टोमॅटोची आवक वाढल्याने आता येत्या काळात किंमती घसण्याची शक्यता आहे. तर केंद्र सरकारने कांदाच्या स्टाॅक बाजारात आणल्याने आता येत्या महिन्यात कांद्याच्या किंमती देखील घसल्याचं दिसू शकतात. त्याचबरोबर पालेभाज्यांचे देर देखील कमी होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या

RBIनं ‘या’ बॅंकेवर घातली बंदी, खात्यातून फक्त 10 हजार काढण्याची मुभा

काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यासह तब्बल 12 आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी

हिवाळ्यात वाढतोय ‘या’ आजाराचा धोका; घ्या ‘ही’ खास काळजी

“शरद पवार तो काळ गेला”; ॲड. गुणरत्न सदावर्तेंचा पवारांना इशारा

एकेकाळी होती राहुल गांधींसोबत लग्नाची अफवा, आता केला भाजपमध्ये प्रवेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More