मुंबई | राज्यात गेला आठवडाभर वरुणराजा थैमान घालतो आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरामुळे वाहतूक आणि दळणवळण (Transportation) ठप्प झाले असल्याने शहरांना भाज्या, फळे आणि इतर गोष्टींचा पुरवठा करणाऱ्या सर्वच सुविधा कोलमडल्या आहेत. परिस्थिती अशीच राहीली तर मुंबई ठाण्यातील किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे.
आतापर्यंतच्या पावसात सुमारे 2,33,897 हेक्टरवरील खरीप हंगामातील पेरण्यांसह नगदी पिके आणि फलबागांचं नुकसान झालं आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसाने नाशिकमध्ये भाज्यांची आवक निम्मी कमी झाली असून खड्यांतील रस्त्यांतून मुंबई ठाण्याला गाड्या आणणं मोठी कसरत ठरत आहे. याचाच परीणाम भाजीपाला आणि फळांवर झाल्याचं दिसून आले. मुंबई आणि ठाण्याला भाज्या आणि फळे पुरवणारी कृषी उत्पादक समितीत गेल्या दोन-तीन दिवसांत 60 ते 70 टक्क्यांनी घट झाली आहे.
मुंबई ठाण्यातील आवक 40 टक्क्यांनी घटली आहे. आठवड्याभरापूर्वी 60 ते 70 रुरये विक्री होणाऱ्या भेंडी आणि गवार भाज्या आता 100 ते 120 रुपये किलोने मिळत आहेत. इतर भाजीपाला आणि फळांच्या किमतीतही वाढ झाली आहे. वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये नेहमी पोहोचणाऱ्या गाड्या आता 8 ते 10 तास उशीरा पोहोचत आहेत.
राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांतील लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. एकूण 151.33 लाख हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याचे आकडे आहेत. शेतकऱ्यांवर सध्या दुबार पेरणीचे संकट आले आहे. राज्यात अजून सरकारचे मंत्रीमंडळ तयार नाही. त्यामुळे कृषीमंत्र्यांजवळ न्यायही मागता येणार नाही. सध्या झालेल्या पावसात शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार का? हे आगामी काळात पहावे लागेल. तसेच मुंबई आणि ठाणेकरांसाठी वाढलेल्या महागाईवर शासन काय निर्णय घेणार हे पहाणे देखील महत्वाचे ठरेल.
थोडक्यात बातम्या –
रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेचे अंतरिम राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली!
मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शकाचा राहत्या घरी आढळला मृतदेह
सुष्मिता डेट करत असलेल्या ललित मोदीची संपत्ती आली समोर; वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे
‘कॉफी विथ करण 7’ मध्ये जान्हवी कपूरचा मोठा खुलासा, म्हणाली…
अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; नवं गाणं लवकरच येणार
Comments are closed.