सर्वसामान्यांनी खायचे तरी काय?, फळभाज्यांचे किलोचे दर शंभरी पार; पालेभाज्याही महागल्या

Vegetables Prices Increased | बाजारात फळभाज्या आणि पालेभाज्या महागल्या आहेत. कडक ऊन, तसेच पूर्वमोसमी पावसामुळे फळभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा परिणाम फळभाज्यांच्या लागवडीवर झाला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये आवक ही कमी झाली आहे.

सध्या सर्व प्रकारच्या भाज्यांच्या दरात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. काही फळभाज्या तर शंभरी पार गेल्याने सामान्य माणसाने खायचे तरी काय?, असा प्रश्न केला जात आहे.

‘या’ भाज्यांचे किलोचे दर वाढले

घाऊक बाजारात गेल्या आठवडाभरापासून फळभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत असल्याने राज्य, तसेच परराज्यातून फळभाज्यांची आवक करण्यात आली. परिणामी बहुतांश फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

नवीन लागवड करण्यासाठी अजून तरी एक ते (Vegetables Prices Increased ) दीड महिन्याचा वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्या फळभाज्यांचे दर तेजीत राहणार असल्याचं म्हटलं जातंय. यामुळे सर्व सामान्य लोक खरेदी करताना आखडता हाथ घेत आहेत.

पालेभाज्यांच्या दरात तेजी

सध्या बाजारात कांदे 40 ते 45 रुपये किलोने विकले जात आहेत. तर, कोथिंबीर सर्वात महाग झाली आहे. कोथिंबिरीच्या एका जुडीचे दर हे तब्बल 70 ते 80 रुपये झाले आहेत. भेंडी 120 ते 140 रुपये किलो, गवार 150 ते 160 रुपये किलो, फ्लाॅवर 100 ते 120 रुपये किलोने विकली जात आहे.

तसंच टोमॅटो 70 ते 80 रुपये किलो, कोबी 70 ते 80 आणि पालेभाज्या 40 ते 50 रुपयांनी विकल्या जात आहेत. त्यातच बाजारात चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांची आवक (Vegetables Prices Increased ) कमी प्रमाणावर होत आहे. आता अजून महिनाभर पालेभाज्यांचे दर तेजीत राहणार असल्याची माहिती आहे.

News Title –  Vegetables Prices Increased

महत्त्वाच्या बातम्या-

‘सेक्स, सेक्स, सेक्स’; अनिल कपूरच्या उत्तराने करण जोहरला पण बसला धक्का!

‘लालपरी’ने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!

शेतकऱ्यांनो स्मार्ट शेती करण्यासाठी हे 3 सोलर उपकरणे वापरा; खर्च होईल कमी

बकरी ईदनिमित्त आज पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

राज्याच्या महसूल विभागाचा गजब कारभार, जिजाऊंच्या पुण्यतिथीला जयंतीचं अभिवादन