बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऐकावं ते नवलच! फॅार्च्युनर गाडीतून वांग्यांची विक्री, पाहा व्हायरल व्हिडीओ-

मुंबई | ‘शेतकऱ्याचा नादच खुळा’ आतापर्यंत आपण रस्त्यावर फळे-भाज्या विकताना अनेक गाड्या पाहिल्या असतील, पण चक्क 31 लाखांच्या नव्याकोऱ्या टोयोटा फॉर्च्युनरमधून भाजीविक्री करत असल्याचा प्रकार शिरगावातून समोर आला आहे. महाराष्ट्रातील एक शेतकरी 31 लाखांच्या फॉर्च्युनर गाडीमधून वांगे विकत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, फॉर्च्यूनर गाडीच्या डिक्कीमध्ये भाजीपाला ठेवून हा व्यक्ती भाजी विकत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. ही गाडी एका डॉक्टरची असल्याचं या भाजी विक्री करणाऱ्या शेतकऱ्याने म्हटलं आहे. तसेच या डॉक्टरने भाजी विक्रीसाठी ती गाडी आपल्याला दिल्याचंही त्यांनी आपल्या व्हिडिओमधून सांगितलं.

31 लाख रुपयांच्या गाडीमध्ये भाजीपाला विक्री करत असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तसेच काही लोक या गाडी वळ उभे राहून भाजी खरेदी करताना देखील पाहायला मिळत आहेत. नेमकं हा व्हिडिओ कोणत्या शिरगावातला आहे, हे व्हिडिओमधून स्पष्ट झालेलं नसलं तरी हा महाराष्ट्रातीलच व्हिडिओ असल्याचं समोर आलं आहे.

डॉक्टरने ही नवी कोरी, चकाकणारी 31 लाखांची फॉर्च्युनर गाडी या शेतकऱ्याला भाजी विक्री करण्यासाठी दिल्याने नागरिकांमध्ये अनेक प्रश्न आणि चर्चा रंगू लागल्या आहेत.

पाहा व्हिडिओ –

थोडक्यात बातम्या –

“गाय मालकावर नाराज झाली, तरी ती खाटीकाच्या घरी जात नाही; आम्ही मोदींसोबत आहोत”

यशस्वी बिझनेसवुमन आणि टाइम्स ग्रुपच्या चेअरपर्सन पद्मभूषण इंदू जैन यांचं निधन

धनंजय मुंडेसोबतच्या नात्याचा पुस्तकातून करणार उलगडा; दुसऱ्या पत्नीची फेसबुक पोस्ट चर्चेत

“एक दिवस रिषभ पंत भारताचा सर्वोत्तम कर्णधार असेल”

“लस नसतानाही फोन केला असता कंटाळवाणी काॅलरट्युन ऐकावी लागते”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More