जेटलींचं नाव चुकीचं लिहिलं, राहुल गांधींविरोधात अवमान नोटीस

नवी दिल्ली | उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात अवमान नोटीस दाखल केलीय. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं नाव चुकीचं लिहिल्याचा आरोप राहुल गांधींवर आहे. 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चुकीचा टीका केल्याचा काँग्रेसचा आरोप होता. ज्याप्रकरणी अरुण जेटली यांनी सभागृहात स्पष्टीकरण दिलं होतं. 

दरम्यान, याप्रकरणी राहुल गांधी यांनी ट्विट करुन जेटली तसेच मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला होता. ज्यामध्ये अरुण जेटलींचा उल्लेख Jaitlie असा करण्यात आला होता. आता याप्रकरणी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन काय निर्णय देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या