रवी शास्त्रीसोबत आता व्यंकटेश प्रसादही प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत

मुंबई | रवी शास्त्रीनंतर भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादही प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत सामील झाला आहे. अनिल कुंबळेच्या राजीनाम्यानंतर नव्याने अर्ज भरणारांमध्ये या दोघांचा समावेश आहे.

व्यंकटेश प्रसाद नव्वदच्या दशकात भारतासाठी ३३ कसोटी आणि १६२ एकदिवसीय सामने खेळला आहे. व्यंकटेश प्रसाद सध्या ज्यूनियर भारतीय संघाचा निवडकर्ता आहे. २००७ ते २००९ या कालावधीत तो भारताचा गोलंदाजी प्रशिक्षकही होता.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या