बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भर कार्यक्रमात कन्हैय्या कुमार आणि राम कदम यांच्यात शाब्दिक चकमक; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | देशातील प्रसिद्ध जेएनयू (JNU) विद्यापाठीतील युवा नेता आणि नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला कन्हैय्या कुमार (Kanhaiyya Kumar) आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. देशभक्तीच्या मुद्द्यावरून अनेक कार्यक्रमात त्याने भाजप नेत्यांच्या तोंडचं पाणी देखील पळवलं आहे. अशातच एका कार्यक्रमात भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) आणि कन्हैय्या कुमार आमने सामने आपल्याचं पहायला मिळालं आहे. (Verbal clash between Kanhaiyya Kumar and Ram Kadam)

वृत्तवाहिनी न्यूज 18 च्या चौपाल या कार्यक्रमात राम कदम आणि कन्हैय्या कुमार यांच्यात जोरदार शाब्दिक वाद पेटल्याचं पहायला मिळालं. राम कदम यांनी कन्हैय्या कुमारला ‘भारत माता की जय’ म्हणण्याचं आव्हान दिलं. त्यानंतर कन्हैय्याने देखील राम कदम यांना गोडसे (Godse) मुर्दाबाद म्हणण्याचं आव्हान दिलं. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचं पहायला मिळालं आहे.

चर्चा सुरू असताना राम कदम यांनी कन्हैय्याच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली आणि भारत माता की जय म्हणून दाखवा, असं राम कदम म्हणाले. त्यावेळी कन्हैय्याने रोखठोक उत्तर दिलं आहे. तुम्ही माझ्यामधला बिहारी जागा केला आहे. आतापर्यंत मी तुमच्याशी आदराने बोलत होतो. आम्ही भारत माता की जय बोलतो, पण तुम्ही गांधींना मानत असाल तर गोडसे मुर्दाबाद बोलून दाखवा, असं आव्हान कन्हैय्याने दिलं.

दरम्यान, तुम्ही गोडसे मुर्दाबाद बोला असं म्हणताय, पण आम्ही गोडसे जिंदाबाद असं कधी म्हटलंय?. गांधींच्या विचारसरणीचा अपमान कधी केला?, असा प्रतिसवाल राम कदमांनी केला. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील शब्दिक चकमक चांंगलीच गाजल्याचं पहायला मिळालं आहे.

पाहा व्हिडीओ-


थोडक्यात बातम्या-

“माफी तर मागितली, पण प्रायश्चित्त कसं करणार?”

ऐकावं ते नवलच! ओमिक्रॉनबाधित पहिला रूग्ण फरार

“लोकांनी इंदिरा गांधींना ज्या पद्धतीने उत्तर दिलं, तसंच उत्तर आता मोदींनाही मिळेल”

भारतासाठी दिलासायक बातमी! Omicron विरुद्ध ‘ही’ लस ठरु शकते अधिक प्रभावी

“ममता मोदींच्या इन्फॉर्मर, त्या विरोधकांना फोडून कमकुवत करत आहेत’”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More