शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!

मुंबई | शेअर मार्केटमध्ये (Share Market) पैसे गुंतवणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शेअर बाजारात पैसे लावणाऱ्यासाठी रेग्युलेट म्हणजे नियम आणि काही अटी लावण्यात येणार आहेत. 

सेबी बोर्डाची (Sebo Board) मिटिंग होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यात शेअर बायबॅकचे नियम बदलण्यात येणार आहेत. तसेच या बैठकीत एमआयआयच्या कारभारावर देखील चर्चा होऊ शकते.

सेबीने गेल्या महिन्यात नियमांमध्ये सुधारणा करण्याबाबत एक पत्रक जारी केलं होतं. या पत्रकासोबत काही सल्ले असतील तर ते सुचवण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

कर्जमुक्त कंपन्या एका आर्थिक वर्षात टेंडरच्या माध्यमातून दोन बायबॅक आणू शकतात, असं त्यात म्हटलं होतं. सेबीच्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बायबॅक प्रक्रियेचा कालावधी कमी करण्याचाही प्रस्ताव आहे. बऱ्याच कंपन्या बायबॅकसाठी सहा महिन्यांपेक्षा जास्त वेळ राखून ठेवतात. अशा परिस्थितीत स्टॉकवर योग्य किंमत दाखवली जात नाही.

महत्त्वाच्या बातम्या-