Sex Life | सेक्स म्हणजे फक्त शरीर सुखाचा आनंद नव्हे. तर सेक्सकरणं प्रत्येक प्रौढासाठी चांगलं आहे आणि रोज सेक्स केला तर त्याचे फायदेच फायदे आहेत. सेक्स (Sex Life) केल्याने तुम्हाला चांगली झोप तर येईलच त्याचबरोबर तुमचा ताण दूर होईल आणि कॅलरीजही बर्न होतील. याबाबत तज्ज्ञांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. तुम्हाला माहित आहे का की सेक्समुळे हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य वाढते आणि तुमचे हृदय निरोगी राहते? मग रोजच्या सेक्सचा तुमच्या वैयक्तिक जीवनात आणखी काय परिणाम होतो? हे जाणून घेऊया.
रोज सेक्स करणं चांगलं आहे का?
चांगली झोप– सेक्स केल्याने तुमच्या शरीरात ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिन नावाचे हार्मोन्स बाहेर पडतात ज्यामुळे जवळीक वाढते आणि तुम्हाला पुन्हा-पुन्हा लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा निर्माण होते. या हार्मोन्समुळे चांगली झोपही येते.
तणाव कमी होतो– दररोज सेक्स (Sex Life) केल्याने मूड सुधारण्यासाठी आवश्यक एंडोर्फिन हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे तणाव कमी होतो. लैंगिक संबंध हा एक प्रकारचा व्यायाम आहे. जो तणाव कमी करतो आणि तुम्हाला शांत ठेवतो. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा फक्त तुमच्या जोडीदारासोबत लैंगिक संबंध ठेवा. तणावावर मात करण्याचा हा सर्वात जलद परंतु निरोगी मार्ग आहे.
रक्तदाबाचा धोका कमी होतो– जास्त तणावामुळे रक्तदाबाचा त्रास होण्याचा धोका असू शकतो. तुम्ही जितके जास्त लैंगिक संबंध कराल तितका तुमचा ताण कमी होत असल्याचे तुम्हाला दिसेल आणि त्यामुळे तुम्ही ब्लड प्रेशरच्या धोक्यापासून वाचू शकता. हस्तमैथुनामुळे रक्तदाबाचा धोकाही कमी होतो कारण ते मज्जातंतूंना आराम देते आणि तुमचे मन मजबूत ठेवते.
तुम्ही तरुण दिसता…– सकाळी तुमच्या चेहऱ्यावर दिसणारी चमक आता केवळ कल्पनाच राहणार नाही. जर तुम्हाला मुरुम किंवा कोरड्या त्वचेची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोज लैंगिक संबंध प्रस्थापित करा आणि तुम्हाला दिसेल की तुमच्या त्वचेला एक चांगली पोत मिळेल. ही नैसर्गिक चमक तणावमुक्त आणि सकारात्मक विचारांना कारणीभूत ठरू शकते. तुम्ही जितके जास्त लैंगिक संबंध ठेवाल तितके तुमचे नाते चांगले होईल.
नैराश्याचा धोका कमी होतो– दररोज लैंगिक संबंध ठेवल्याने देखील नियमित व्यायाम करण्यासारखेच फायदे मिळतात. हे डोपामाइन, सेरोटोनिन, एंडोर्फिन आणि ऑक्सिटोसिन सारखे आनंदी हार्मोन्स शरीरात तयार करतं. हे फील-गुड हार्मोन्स नैराश्य दूर करण्यास मदत करतात आणि ते विकसित होण्याचा धोका कमी करू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
बाळाला सेरेलॅक खाऊ घालताय?, अगोदर ही धक्कादायक माहिती नक्की जाणून घ्या
विद्या बालनच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओची सगळीकडे एकच चर्चा!
हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस धो-धो बरसणार
भन्नाट फीचर्ससह BMW कंपनीची बाईक बाजारात लाँच; किंमत काय असणार?
निलेश लंके वादात अडकणार?; कुख्यात गुंड गजा मारणेची भेट स्वीकारली