नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) सर्वात मोठ्या मास्टरस्ट्रोकची माहिती समोर आली आहे. तमिळनाडूतील रामनाथपुरम लोकसभा मतदार संघातून मोदी निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वडोदरा आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून निवडणूक लढवली होती. मात्र 2024 मोदी तमिळनाडूमधून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जातंय.
उत्तर भारतात नितीश कुमार, सुखबीर बादल आणि इतर लहान पक्षांमुळे जे नुकसान झालंय, ते दक्षिण भारतातून भरून काढण्याचा भाजपचा विचार आहे.
दरम्यान, रामनाथपुरम जिल्हा तामिळनाडूच्या ३38जिल्ह्यांपैकी एक आहे. हा परिसर माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे जन्मस्थान आहे.
रामेश्वरम, तामिळनाडूतील सर्वात महत्त्वाचे देवस्थान आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, याच जिल्ह्यात आहे. याशिवाय रामसेतूचीही सुरुवात येथून होते, ज्याद्वारे रामाने लंका जिंकली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
- अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; राजकीय वर्तुळात खळबळ
- ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटर्स आहेत फारच स्वस्त, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल खुश
- ‘तो खासदार परत दिसणार नाही’; राऊतांचा दिल्लीतून गंभीर इशारा
- “मुस्लिमांसाठी भारत राहण्यायोग्य देश नाही, माझ्या मुलांना मी…”
- पोस्ट ऑफिसमध्ये करा अशी गुंतवणूक; कधीच येणार नाही पैशांची अडचण