फडणवीस आणि शिंदेंच्या शपथविधीसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर!
मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. भाजपकडून सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील गोव्याहून मुंबईकडे रवाना देखील झाले आहेत. ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. अशात शपथविधीसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आज शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर दाखल झालेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा आजच शपथविधी होण्याची शक्यता आहे. दरबार हॉलमध्ये संध्याकाळी 7 ते 9 च्या दरम्यान दोघे शपथबद्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
थोडक्यात बातम्या-
“महाराष्ट्र गुजरातला विकल्याचा आनंद पेढे भरून साजरी करणारी तोंडं लवकरच काळी झालेली दिसतील”
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस-शिंदे यांच्या सरकार स्थापनेचा मुहूर्त ठरला, ‘या’ तारखेला शपथ घेणार
“बाळासाहेबांची शिवसेना आम्ही गगनाला गवसणी घालण्याइतपत मोठी करु”
मोठी बातमी! शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंसह 14 आमदारांना इशारा
“चाणक्य आज लाडू खात असतील, सर पण तुमचा सच्चेपणा अधिक काळ टिकून राहिल”
Comments are closed.