Top News मनोरंजन

तानाजी चित्रपटाला एक वर्ष पुर्ण! शौर्य गाथेचा भाग बनणं खूप अभिमानास्पद- शरद केळकर

मुंबई | मराठमोळा अभिनेता शरद केळकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. ‘तान्हाजी:द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पात्र शरद केळकरने साकारलं होतं. या चित्रपटाला एक वर्ष पुर्ण झालं आहे. यानिमित्त शरदने पोस्ट केली आहे.

शुरवीर सरदार नरवीर तानाजी मालुसरे यांनी आपल्या जीवाची बाजी लावत कोंढाणा किल्ला सर केला होता. त्यांच्या जीवनपटावर चित्रपट रेखाटला होता. या चित्रपटाला एक वर्ष पुर्ण झालं आहे.

हया शौर्य गाथेचा भाग बनणं, छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका पडदयावर जगणं हे माझ्यासाठी खुप अभिमानास्पद आहे! आपण सर्वांनी जे प्रेम दिले त्यासाठी मी ह्रदयापासुन धन्यवाद व्यक्त करतो, असं शरदने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या चित्रपटामध्ये नरवीर तानाजी मालुसरेंची भूमिका अभिनेता अजय देवगणने साकारली होती. तर उदयभानाची भूमिका सैफ अली खानने साकारली होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar)

थोडक्यात बातम्या-

लसीच्या सुरक्षेबाबत शंका, पंतप्रधानांनी आधी स्वत:ला लस टोचून घ्यावी- राष्ट्रवादी

‘आज मला पाकिस्तानला हरवल्यासारखं वाटलं’; भारतीय संघातील ‘या’ शिलेदाराची प्रतिक्रिया

प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे निष्पाप बालकांचा नाहक जीव गेला- देवेंद्र फडणवीस

‘योगी की मौत सुनिश्चित हैं’; आपच्या आमदाराचं वक्तव्य, पाहा व्हिडीओ

ग्वाल्हेरमध्ये हिंदू महासभेने सुरू केली गोडसे ज्ञानशाळा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या