ठाकरेंच्या जवळच्याच माणसाने घात केला?; अत्यंत धक्कादायक बातमी समोर
मुंबई | ठाकरे गटातील एका खासदाराने उलट प्रतिक्रिया दिल्याची बातमी समोर आलीय. या खासदाराने शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याची माहिती मिळाली आहे.
निवडणूक आयोगातील कागदपत्रांमधून हा धक्कादायक खुलासा झालाय. त्यामुळे 14 वा खासदार शिंदे गटात प्रवेश करणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगाकडे जवळपास 24 ते 25 लाख कागदपत्रे देण्यात आले होते. त्यानुसार अनेक खासदार, आमदार, शाखाप्रमुख, विभागप्रमुख, जिल्हाप्रमुख सगळ्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.
शिवसेनेचे 40 आमदार शिंदे गटात गेले होते. त्यानंतर 13 खासदार शिंदे गटात गेले होते. आता एका 14 व्या खासदाराने शिंदे गटाच्या बाजून प्रतिज्ञापत्र दिलं आहे. या खासदाराने प्रतिज्ञापत्रात आपण शिंदे गटाच्या बरोबर असल्याचं म्हटलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा झटका मानला जातोय. या मोठ्या निकालावर आता उद्धव ठाकरे आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय सुरुवात करायची आणि काय बोलायचं हा प्रश्न आपल्या देशात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिलेला निर्णय हा आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी अतिशय घातक निर्णय आहे, असं त्यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.