पुणे मनोरंजन महाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला!

पुणे | जमीन विक्री प्रकल्पात फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्यावर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

पुण्यात मुळशी तालुक्यातील डोंगरगाव मधील जमिनीची स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदा विक्री करुन 14 जणांची फसवणूक केल्याचा गोखलेंवर आरोप लावण्यात आला आहे.

गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन, त्याचा सखोल तपास आवश्यक असल्याचं कारण देत, अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी देशपांडे यांनी गोखले यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळून लावली असल्याचं वकील पुष्कर सप्रे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

साताऱ्यात प्रत्येक शहीद जवानामागे एक झाड लावण्याचा अभिनेते सयाजी शिंदेंचा संकल्प

उत्तर प्रदेशच्या वर्ग-विशेष जंगलराजने आणखी एका तरूणीला मारून टाकलं- राहुल गांधी

इतका निर्दयीपणा आणि भयानक गुन्हा करणाऱ्यांना फासावर लटकवलं पाहिजे- रितेश देशमुख

एकनाथ खडसेंचा पक्षांतराचा निर्णय निश्चित?; कथित ऑडिओ क्लीप व्हायरल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या