बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिनेसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेत्री जयंती यांचं निधन

मुंबई | कन्नड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री जयंती यांचं निधन झालं आहे. बंगळुरूमधील राहत्या घरी त्यांनी वयाच्या 76 वर्षी अखेरचा श्वास घेतला. जयंती यांचा मुलगा कृष्ण कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

जयंती यांचा जन्म कर्नाटकमध्ये 6 जानेवारी 1945 साली झाला. जयंती यांनी आपल्या करियरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. त्यांनी आपलं काम चालू ठेवलं आणि 60 ते 70 दशकात जयंती या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत गणल्या जाऊ लागल्या. जयंती यांनी जवळजवळ 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

जयंती यांनी तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्यासोबतच त्यांनी बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. यामध्ये  त्यांनी ‘बहुरानियां’, ‘तुमसे अच्छा कौन है’ आणि ‘गुंडा’ या तीन चित्रपटांचा समावेश आहे.

दरम्यान, 2018 साली जयंती यांच्या मृत्युची बातमी पसरली होती. त्यावेळी त्यांनी समोर येत अफवांना पूर्णविराम दिला. जयंती यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून अभिनेते सोशल माध्यमांद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

थोडक्यात बातम्या-

…तर मीराबाई चानूलाही मिळू शकतं सुवर्णपदक; जाणून घ्या नेमकं कसं!

भास्कर जाधवांच्या त्या वर्तनावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

‘या’ कारणामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दाैरा रद्द; विशेष विमानाने मातोश्रीकडे रवाना

तलवारीने केक कापणाऱ्या बर्थडे बॉयला पुणे पोलिसांनी दिलं चांगलंच बड्डे गिफ्ट!

“मुख्यमंत्र्यांनी चिपळूण दौऱ्यावर खादीचा कुर्ता घातलेला बाऊन्सर नेला होता काय?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More