Smriti Biswas | हिंदी, मराठी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांचे नाशिक येथील राहत्या घरी निधन झाले. फिल्म हेरिटेज फाऊंडेशनने अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही दुःखद बातमी शेअर केली आहे. त्यांच्यावर आज (4 जुलै) ख्रिश्चन पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्मृती बिस्वास यांनी 1930 ते 1960 या तीन दशकात ‘नेक दिल’, ‘अपराजिता’ आणि ‘मॉडर्न गर्ल’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आणि चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्मृती बिस्वास (Smriti Biswas) या 100 वर्षांच्या होत्या.
ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांचं निधन
नाशिक रोड परिसरातील वन-रुम किचनमध्ये त्या भाड्याने राहत होत्या. त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. गुरू दत्त, व्ही. शांताराम, मृणाल सेन, बिमल रॉय, बीआर चोप्रा आणि राज कपूर यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केलं आहे.
स्मृती यांनी (Smriti Biswas) त्यांच्या करिअरमध्ये देवानंद, किशोर कुमार आणि बलराज साहनी यांसारख्या नामांकित कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. फिल्म हेरिटेज फाऊंडेशनने अभिनेत्री स्मृती बिस्वास यांचा फोटो शेअर करत लिहिले की, “काल अभिनेत्री स्मृती बिस्वास यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झाले. स्मृती बिस्वास यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये आपला वाढदिवस साजरा केला. त्या 1940 आणि 50 च्या दशकातील सर्वात सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक होत्या. ”
View this post on Instagram
ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांची कारकीर्द
दरम्यान, स्मृती बिस्वास (Smriti Biswas) यांनी 1930 मध्ये ‘संध्या’ या बंगाली चित्रपटातून पदार्पण केलं. तर 1960 मध्ये त्या ‘मॉडेल गर्ल’ या चित्रपटात शेवटच्या झळकल्या होत्या. दिग्दर्शक एसडी नारंग यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम केला होता.
यानंतर पतीच्या निधनानंतर त्या नाशिकला राहायला गेल्या होत्या. यावर्षी 17 फेब्रुवारी रोजी त्यांनी 100 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या पश्चात राजीव आणि सत्यजीत ही दोन मुलं आहेत. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.
News Title – Veteran Actress Smriti Biswas Dies At 100
महत्त्वाच्या बातम्या-
दहावी पास तरुणांना थेट सरकारी नोकरीची संधी; वेळ वाया घालू नका, ‘इथे’ करा अर्ज
“परळीत वाल्मिक कराडांची दहशत, इथं धनुभाऊंचं काहीच चालत नाही”
पावसाबाबत हवामान खात्याचा मोठा अंदाज; ‘या’ भागात येलो अलर्ट जारी
लाडकी बहीण योजनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “निवडणुकीआधीचा जुमला..”
वसंत मोरे ठाकरेंच्या वाटेवर?, ‘मातोश्री’वर आज घेणार उद्धव ठाकरेंची भेट