बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन!

मुंबई | ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं मुंबईत निधन झालं. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्या बर्‍याच दिवसांपासून आजारी होत्या. आज त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय.

2020 मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये जवळपास 15 दिवस ट्रिटमेंट घेतल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावतच गेली. 2018 मध्येही त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यातून त्या बऱ्यादेखील झाल्या. मात्र, जास्त काम करु शकल्या नाहीत.

सुरेखा सिक्री यांना 2019 मध्ये ‘बधाई हो’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सुरेखा यांना सपोर्टिंग अभिनेत्री म्हणून तीन वेळा नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळाला आहे.

अभिनेत्री सुरेखा सिक्री यांनी त्यांच्या कारकीर्दीत ‘किस्सा कुर्सी का’, सलीम लंगड़े पे मत रो’, ‘लिटिल बुद्धा’, ‘नसीम’, ‘सरदारी बेगम’, ‘सरफरोश’, ‘दिल्लगी’, ‘हरी-भरी’, ‘जुबैदा’, ‘मिस्टर अँड मिसेस अय्यर’, ‘रेनकोट’, ‘हमको दीवाना कर गए’, ‘देव डी’ आणि ‘बधाई हो’ अशा अनेक चित्रपटांमधून दमदार अभिनय केला होता.

थोडक्यात बातम्या- 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पांडुरंगाच्या दर्शनाचा अधिकार नाही”

सरकार टिकवण्यासाठी अजून किती झुकणार?; उद्यानाच्या नामकरणावरून भाजप शिवसेना आमने-सामने

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा झटका!

‘शासन आदेशात एक नाही तर अनेक गोष्टींचा घोळ’; पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

माजी मंत्री ‘संजय राठोड’ यांना पुणे पोलिसांची क्लिन चिट?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More