“देशातील जनतेला मूर्खात काढलं जातंय, सरकारविरोधात जनतेने बंड पुकारलं पाहिजे”
नवी दिल्ली | देशात कोरोना रूग्णसंख्या वाढत चालल्यानं परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यातच केंद्र सरकारने कोरोना रोखण्यासाठी लाॅकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र सरकार उचलत असलेल्या हळूवार पावलांवर आता देशाचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पी चिदंबरम यांनी टीका केली आहे. त्याचबरोबर आरोग्यमंत्री डाॅ हर्षवर्धन यांना बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
वृत्त वाहिन्यांवर दाखवले जाणारे फुटेज आणि वृत्तपत्रांमधील बातम्या खोट्या आहेत का? डॉक्टर आणि रुग्णांचे नातेवाईक खोटं बोलत आहेत का? सगळे व्हिडिओ बनावट आहेत का? देशातील सर्व नागरिकांना मूर्ख समजणाऱ्या या सरकारविरोधात जनतेने आता बंड पुकारले पाहिजे, असं चिदम्बरम म्हणाले आहेत.
ऑक्सिजन, लस आणि रेमडेसिवीरचा कुठलाही तुटवडा नाही, असं वक्तव्य केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केलं. त्यांचं हे वक्तव्य संताप आणणारं आहे. एवढंच नव्हे तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राज्यात लसीचा कुठलाही तुटवडा नसल्याचं म्हटल्यानं आपल्याला राग येत आहे, असं चिदंबरम म्हणाले.
दरम्यान, आरोग्यमंत्री मात्र सर्वकाही अलबेल असल्याचा सांगत आहेत. आरोग्यमंत्री माणुसकीचा धर्म विसरले आहेत. सत्तेच्या अहंकाराने त्यांना जनतेच्या वेदना दिसत नाही, असं टीका सुप्रिया श्रीनेत यांनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली; राहुल गांधींचा थेट डॉक्टरांना फोन
“देशाबाबत कितीही गर्व करत असले तरी, अवैज्ञानिक लोक देशाला बरबाद करू शकतात”
मोठी बातमी! दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अटक
‘महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करा’; महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी
मास्क न घालणाऱ्यांची दादागिरी, दंड मागणाऱ्या पोलिसाच्या अंगावर सोडला कुत्रा
Comments are closed.