Top News तंत्रज्ञान महाराष्ट्र मुंबई

गायिका आशा भोसलेंचं Insta account झालं हॅक!

मुंबई  | गायिका आशा भोसले यांचं Instagram account सोमवारी हॅक झालं. अकाउंट हॅक झाल्याचं लक्षात येताच काही तासांतच ते रिकव्हर करण्यात यश आलं. पण त्यावरच्या सगळ्या पोस्ट डिलीट कराव्या लागल्या.

हॅकर्सच्या वाढलेल्या कारवायांमुळे सोशल मीडिया वापरतानाचा धोका वाढल्याची जाणीव झाली आहे. फक्त सेलेब्रिटींची अकाउंट्स नव्हे तर सामान्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सनासुद्धा हॅकर्सपासून धोका निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलनं एक अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलनं सांगितलंय तुमच्या इन्स्टा अकाउंटचं युजरनेम आणि पासवर्ड अजिबात कुणाशी शेअर करू नका.

हॅक करणारे गुन्हेगार माहितीचा उपयोग व्यक्तींना ब्लॅकमेल करण्यासाठी करत असल्याचंही सायबर सेल पोलिसांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे तिसऱ्या खेळाडूची कसोटी मालिकेतून माघार

‘…तेव्हा तुमचे मुख्यमंत्री झोपा काढत होते का?’; सुभाष देसाई यांनी भाजपला फटकारलं

तेजस्वी सातपुते यांनी पोलीस दलासाठी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; गृहमंत्र्यांनीही केलं कौतुक

नागपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांची निवड ऑनलाईन होणार!

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अखेर अटक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या