बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, आयसीयूमध्ये दाखल

मुंबई | राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Singer Lata Mangeshkar) यांना कोरोनाची लागण झाली आहे. लता मंगेशकर यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. मात्र, मंगेशकर याचं वय सध्या 92 वर्षे आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लता मंगेशकर याचं वय आणि त्यांना असणाऱ्या आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.

लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षण जाणवत होती. त्यानंतर त्यांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली होती. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मंगेशकर यांचं वय जास्त असल्याने त्यांना होम क्वारंटाईन करणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांना लगेच रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

दरम्यान, लता मंगेशकर यांना याआधी 2019 मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र लता मंगेशकर यांच्या वयामुळे त्यांच्या नातेवाईकांसह त्यांचे चाहतेही काळजीत आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘…तर पुन्हा युती होईल’; रामदास आठवलेंनी सांगितला युतीचा नवा फॉर्म्युला

स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न बघताय?; मग ‘या’ भागात स्वस्त किमतीत मिळणार 1 bhk फ्लॅट

होम आयसोलेशन रुग्णांसाठी महत्त्वाची माहिती, राजेश टोपे म्हणाले..

‘या’ ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

“शरद पवार एसटी महामंडळाकडे आयपीएलच्या खेळाप्रमाणे पाहत आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More