Top News महाराष्ट्र रत्नागिरी

‘बेईमान आणि गद्दारी म्हणजे राणे’; शिवसेनेचं राणेंना चोख प्रत्युत्तर

रत्नागिरी | महाविकास सरकार गद्दारीनं आल असून ते निकम्म असल्याची टीका भाजप नेते नारायण राणे केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपुर्तीच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन राणेंनी सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार विनायक राऊतांनी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

नारायण राणेंनी मिटक्या मारत बसाव. त्यांना सत्ता काही मिळणार नाही. गद्दारीवर राणेंनी काही बोलू नये. बेईमान आणि गद्दारी म्हणजे राणे, अशा शब्दात विनायक राऊतांनी राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

नितेश राणे एका जबरदस्त केसमध्ये अडकले आहेत. एका केसमध्ये ते तुरूंगाच्या दारापर्यंत जाऊन आलेत. तो तुरूंगवास टाळावा म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

दरम्यान, नारायण राणेंनी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काय केलं हे सर्वांना माहित आहे. राणेंच्या संपत्तीची ईडी चौकशी करा, असंही राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

शीतल आमटेंच्या सासू-सासऱ्यांचे आमटे कुटुंबावर धक्कादायक आरोप

विराट बनला सर्वात वेगवान आणि सर्वात जलद; सचिनचाही विक्रम मोडला!

“मास्क न घालणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये काम करण्याची शिक्षा द्या”

तुटवडा की छपाई बंद???; आता एटीएममध्ये मिळणार नाहीत ‘या’ नोटा!

“मराठा आरक्षण हा राजकीय विषय नाही, मराठा समाजाचं नुकसान होऊ नये हीच माझी प्रमाणिक भावना”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या