बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विदेशी माध्यमांना भारताचा विकास पचत नाही”

नवी दिल्ली | अभिनेता वीर दास याने अमेरीकेत भारताबद्दले केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून देशात सर्वत्र वाद पेटला होता. त्यानंतर आता उपराष्ट्रपती वंकय्या नायडू यांनी पाश्चात्य माध्यमांवर निशाणा साधला आहे. ते दिल्लीत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्यावेळी बोलत होते. यावेळी त्यांनी भारत हा सर्वाधिक धर्मनिरपेक्ष देश असून पाश्चात्य देशांना ते पटत नसल्याचं म्हटलं आहे.

ते म्हणाले, ‘भारताची प्रतिमा नकारात्मक पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्या हा ट्रेंडचं दिसतोय. विशेषत: पाश्चात्य माध्यमांमध्ये हा ट्रेंड दिसतोय. त्यांना हे सहन होत नाही की भारत प्रगती करतोय, भारताला जागतिक स्तरावर विश्वगुरु म्हणून सन्मान मिळतोय. त्यामुळे भारताची प्रतिमा नकारात्मक पद्धतीने मांडली जात आहे,’ असा घणाघात त्यांनी केला आहे.

नायडू पुढे म्हणाले, ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वृत्तपत्रांना स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता या मुद्द्यांवरून ते भारतावर टीका करत आहेत. पण माझ्या अभ्यासानुसार भारत हा सर्वाधिक धर्मनिरपेक्ष देश आहे. असा दुसरा कोणताही देश नाही. इथे जात,धर्म, लिंग प्रदेश यावरून भेदभाव होत नाही. त्या सगळ्यांचा सन्मान होतो,’ असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, ‘त्यांनी यावेळी काही अपवादात्मक घटनाही होत असल्याचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले, अपवादात्मक घटना असल्या तरी देश म्हणून आपण धर्मनिरपेक्ष आहोत. कारण भारतात धर्मनिरपेक्षता ही भारतीयांच्या रक्तात, नसानसात आहे आणि ती केवळ एखाद्या सरकारमुळे नाही तर देशाच्या जनतेमुळे आहे,’ असंही ते म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“महाविकास आघाडी सरकार म्हणजे दुसऱ्याच्या ताटात तोंड घालणारे मांजर”

“वीर दासने दोन भारत दाखवले म्हणून उच्चभ्रूंच्या कपाळात…”

शेअर बाजारात घसरण पण ‘बिगबुल’च्या शेअर्समध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांची वाढ

मुंबईतील कोरोनाबाधितांसह मृतांची संख्याही दिलासादायक, वाचा ताजी आकडेवारी

“जरा जास्तच मुदत दिल्याबद्दल नारायण राणेेेंचे आभार”, जयंत पाटलांचा पलटवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More