बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लग्नात फोटो काढण्याची परवानगी नसतानाही विकी आणि कतरिनाचा पहिला फोटो व्हायरल

मुंबई | कलासृष्टीत मागील काही काळात अनेकांचे लग्न सोहळे झालेले पहायला मिळाले. अनेक मोठमोठ्या कलाकारांनी लग्नगाठ बांधली. अशातच आता आणखी एक लोकप्रिय जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे सध्या त्या लोकप्रिय जोडीचीच चर्चा रंगलेली दिसत आहे. ही लोकप्रिय जोडी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेता विकी कौशल (Actor Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Actress Katrina kaif) आहे.

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच लग्नगाठ (Marriage) बांधणार असून सध्या त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. विकी आणि कतरिना त्यांच्या लग्नासाठी आता लवकरच राजस्थानला रवाना होतील.

विकी आणि कतरिनाच्या लग्नात सेल्फीही काढण्यास मनाई करण्यात आल्याचं समजतंय. त्यामुळे त्यांचे लग्नाचे फोटो लगेच समोर येतील की नाही याबाबत शंका आहे. मात्र सध्या त्या दोघांचा भलताच फोटो सोशल मिडियावर व्हायरल (Viral) होत आहे. यामध्ये त्या दोघांचाही फोटो एडिट केलेला पहायला मिळत आहे.

दरम्यान, व्हायरल होत असलेला फोटो विरल भयानी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ‘लग्नात परवानगी नाही पण फक्त डोक अशी खेळी करू शकतं.’ असं भन्नाट कॅप्शनही दिलं आहे. त्यामुळे विकी आणि कतरिनाच्या या भन्नाट फोटोनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

थोडक्यात बातम्या – 

“कधी कुणाला दहशतवादी समजून गोळ्या घातल्या जातात तर कधी देशद्रोही ठरवून जेलमध्ये टाकलं जातं, आता फक्त…”

सारा अली खानने दिला आईसोबत काम करण्यास नकार; कारण वाचून थक्क व्हाल

टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा वचपा, 372 धावांनी न्यूझीलंडचा दणदणीत पराभव

महाराष्ट्रात लाॅकडाऊन लागणार?; अजित पवार म्हणतात…

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला ईडीचा जोरदार झटका; केली लूकआउट नोटीस जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More