बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अंकिता लोखंडेला पतीने लग्नात दिलं खास गिफ्ट; किंमत ऐकून थक्क व्हाल

मुंबई | मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात एका पाठोपाठ एक अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. पवित्र रिश्ता मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेनेही उद्योगपती विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली.

सध्या सोशल मीडियावर देखील अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैनच्या (Vicky Jain) लग्नाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. अंकिता आणि विकीच्या लग्नापेक्षाही सध्या अंकिताला नवऱ्याकडून मिळालेल्या जबरदस्त गिफ्टची चर्चा होत आहे.

विकीने अंकिताला लग्नाचं गिफ्ट म्हणून कोट्यवधी रूपयांचं फार्म हाऊस (Farm House) दिलं आहे. एका यूट्यूब चॅनेलच्या सूत्रानूसार विकीने अंकिताला गिफ्ट केलेल्या या फार्म हाऊसची किंमत तब्बल 50 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे.

फक्त फार्म हाऊसच नाही तर विकीने 8 कोटी किंमतीची एक खासगी बोट खरेदी केली असल्याची देखील चर्चा आहे. अंकिताला विकी जैन कडूनच नाही तर इंडस्ट्रीमधील मित्र मैत्रिणींकडूनही लग्नात लाखो रूपयांचे गिफ्ट मिळाले आहेत. अंकिता आणि विकीच्या राजेशाही लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

थोडक्यात बातम्या-

Gold Silver Price: सोने चांदीचे भाव पुन्हा वधारले; वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे दर

जयंत पाटलांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले…

“मुस्लिमांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही तर ओवेसी साहेब पंतप्रधान कसे होणार?”

“महाविकास आघाडी सरकारच्या टाळाटाळीमुळे ओबीसी समाजाचे आरक्षण गेले”

क्वारंटाईनचे नियम तोडून आलिया भट्ट पोहोचली दिल्लीला; आता मुंबईत परतताच…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More