कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्यात वाद, विकी म्हणाला, तिने मला…

Vicky and Katrina l बॉलिवूडची लोकप्रिय जोडी अभिनेता विकी काैशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे नेहमीच चर्चेत असतात. विकी काैशल आणि कतरिना कैफ हे 2021 मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत.यांचा विवाहसोहळा हा राजस्थानमध्ये अत्यंत खास पद्धतीने पार पडला. त्या दोघांनीही लग्नानंतर काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे दोघेही नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसतात. अशातच कतरिना कैफ हिने काही दिवसांपूर्वीच विकी काैशल याच्या चित्रपटाचे प्रमोशन देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केले होते.

विकी काैशल आणि कतरिना यांच्यातील नेमका वाद काय? :

विकी काैशल आणि कतरिना कैफ यांची जोडी चाहत्यांची आवडती जोडी आहे. एका मुलाखतीमध्ये विकी काैशलने कतरिना कैफ हिच्यासोबत होत असलेल्या वादावर एक भाष्य केले आहे. या मुलाखतीमध्ये त्याने दोघांमध्ये कोणत्या कारणामुळे कायमच वाद होतात याचा खुलासा केला आहे. यावेळी विकी काैशल स्पष्टपणे म्हणाला की, आमच्या दोघात एकाच कारणामुळे नेहमी वाद होतात.

आता सर्वांना प्रश्न पडला असेल की, नेमका वाद कशामुळे होतो. तर कपाटातील जागेवरून आमच्यात नेहमी वाद होतात. तिने तिचे साहित्य हे दीड खोलीमध्ये ठेवले आहे आणि माझ्याकडे एक फक्त वॉर्डरोब आहे जो की लवकरच ड्रॉवर बनू शकेल. हा खुलासा विकी कौशलने करण जोहरच्या शोमध्ये केला आहे.

Vicky and Katrina l कतरिनाने विकीला दिली होती धमकी :

विकी काैशलचे हे बोलणे ऐकून करण देखील त्याला बिचारा म्हणत आहे. यावर करणने देखील म्हटले की, शेवटी ती एक ‘हिरोईन’ आहे… अगदी काही दिवसांपूर्वीच अभिनेता विकी काैशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस विदेशात साजरा केला आहे.

लग्नापूर्वी विकी काैशल आणि कतरिना कैफ हे एकमेकांना खूप दिवस डेट करत होते. अनेक दिवस डेट केल्यानंतर त्या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र लग्न करण्याच्या अगोदरच कतरिनाने विकीला एक मोठी धमकी दिल्याचेही त्याने सांगितले होते. त्यावेळी ती म्हणाली की, लग्नाच्या दोन दिवसांनी लगेचच चित्रपटाची शूटिंग करणार असशील तर लग्न नाही करायचे असेच थेट कतरिना म्हणाली होती.

News Title – Vicky Kaushal and Katrina Kaif have a dispute

महत्त्वाच्या बातम्या-

त्या माय-लेकींनी टवाळखोरांना असं काही धुतलं की पुन्हा आयुष्यात …

“..पेक्षा सत्तेतून बाहेर पडलेलं बरं”; अजित पवारांच्या जवळच्या नेत्याचं विधान, नेमकं काय घडलं?

“राष्ट्रवादीसोबत असल्याने उलट्या होतात, मला अ‍ॅलर्जी.. “; शिंदे गटाच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

शिवरायांचा पुतळा कोसळण्यामागे ठाकरे गटाच्या नेत्याचा हात?, निलेश राणेंचा गंभीर आरोप

महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट, पुढील 24 तास धोक्याचे?; IMD चा स्पष्ट इशारा