बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्राच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्याच्या नातीला ‘हा’ बॉलिवूड अभिनेता करतोय डेट???

मुंबई | प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला डेट करत असल्याची प्रचंड चर्चा रंगली आहे. कतरिना आणि विकीने साखरुपुडा केल्याची देखील जोरदार चर्चा रंगली होती. मात्र नंतर ती खोटी असल्याचं समोर आलं. यानंतर आता विकी कौशलचा भाऊ सनी कौशल चर्चेत आला आहे.

सनी कौशलचे नाव अभिनेत्री शरवरी वाघसोबत जोडलं जात आहे. त्यामुळे शरवरी आणि सनी एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. शरवरी ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. त्यामुळे ती अभिनेत्री जरी असली तरी तिच्या घराची पार्श्वभूमी राजकीय आहे. सनी आणि शरवरीने ‘द फरगाॅटन आर्मी’ मध्ये एकत्र काम केलं आहे.

शरवरीची आई नम्रता वाघ मनोहर जोशी यांची कन्या आहे. तर शरवरीचे वडिल हे मोठे उद्योगपती आहेत. तरी देखील शरवरी चित्रपटांमधून लोकांच्या भेटीस येणार असून ती लवकरच ‘बंटी ऑर बबली’च्या सिक्वलमध्ये दिसणार आहे.

दरम्यान, शरवरी आणि सनी दोघे एकमेकांना खरच डेट करत आहेत का हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र दोघांना सातत्याने एकत्र पाहिल जातं असल्याने या चर्चेला उधाण आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवारांचा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणजे मगरीचे अश्रू पुसण्याचं काम”

‘आर्यन एक गुणी मुलगा, दुर्देवानं…’; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा आर्यन खानला पाठिंबा!

“मुंबईत अंमली पदार्थाची सर्रास तस्करी होत असताना राज्याचे गृहमंत्री झोपले आहेत का?”

‘माझा मुलगा तिथं असल्याचा पुरावा मिळाला तर मी…’; अजय मिश्रा यांचं खुलं आव्हान!

बाबो! ‘फेअर अँड लव्हली’ची जाहिरात करणाऱ्या यामी गौतमला आहे ‘हा’ गंभीर त्वचा रोग!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More