बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लवकरच साखरपुडा करेल…; कतरिना सोबतच्या साखरपुड्यावर विकी कौशलने सोडलं मौन

मुंबई | ऑगस्टमध्ये बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा रंगली होती. यानंतर विकी आणि कतरिनाला अनेक वेळा एकत्र स्पाॅट करण्यात आलं होतं. तर अनेक वेळा विकीला कतरिनाच्या घराबाहेर देखील स्पाॅट करण्यात आलं होतंं. अशातच आता विकीने त्यांच्या साखरपुड्याबाबत मौन सोडलं आहे.

एका मुलाखतीमध्ये अशा प्रकारच्या बातम्या तुमचीच मित्रमंडळी पसरवतात, असं विकीने म्हटलं आहे. तसेच वेळ आल्यावर मी नक्की साखरपुडा करेल आणि लवकरच ती वेळ देखील येईल, असं विक्की कौशलने यावेळी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना विकीने नक्की कुणासोबत साखरपुडा करेल याची माहिती दिली नाही. त्यामुळे विकी आणि कतरिनाच्या चर्चेला अद्याप पूर्णविराम मिळणार नाही. तसेच विकीच्या साखरपुड्याला घेऊन आता त्याच्या चाहत्यांमध्ये आणखी उत्सुकता वाढली आहे. विकी आणि कतरिना डेट करत आहेत की नाही?, असा सवाल देखील चाहत्यांना उपस्थित झाला आहे.

दरम्यान, विकी कौशल सध्या बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला डेट करत असल्याची प्रचंड चर्चा रंगली आहे. कतरिना आणि विकीने साखरपुडा केल्याची देखील जोरदार चर्चा रंगली होती. मात्र नंतर ती खोटी असल्याचं समोर आलं. यानंतर विकी कौशलचा भाऊ सनी कौशल देखील चर्चेत आला. सनी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीला डेट करत असल्याची माहितीही समोर आली आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान

T-20 विश्वचषकापुर्वीची ‘ती’ एक चूक अन् पाकिस्तानला मागावी लागली बीसीसीआयची माफी

कोरोना लस न घेण्याचा निर्णय आला ‘या’ अभिनेत्रीच्या अंगलट, वाचा सविस्तर

‘या’ कारणामुळे भारतीय हवाई हद्दीत घुसलं शेजारील देशाचं विमान

महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्याने रचला इतिहास, केलं 100 टक्के लसीकरण पुर्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More