बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अंधश्रद्धेचा बळी, सर्पदंश झाल्यावर 3 तास ठेवले मारूती मंदिरात

उस्मानाबाद | सर्पदंश झाल्यानंतर विष उतरण्यासाठी मारूती मंदिरात ठेवल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे घडली आहे. एक तरूण गुरांना कडबा काढायला गेला असता सर्पदंश झाल्याचं समोर आलं आहे.  मारूतीला घाम फुटल्यानंतर मुलाचं विष उतरेल असा भाबडा समज करून गावातील लोकांनी घंटानाद करत तरूणाला मारूती मंदिरात ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

यासंदर्भात सर्पमित्र महेश थेटे यांना सर्पदंश झाल्याचा काॅल आला होता. सर्पदंश झालेल्या मुलाला प्रशमोपचारासाठी तातडीने हाॅस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला महेश थेटे यांनी दिला होता. परंतु, गावातल्या मंडळींनी हाॅस्पिटलमध्ये नेण्यापासून अडवलं. पोरगं दवाखान्यात नेल्यास जगणार नाही. विष उतरण्यासाठी काळ्या मारूतीच्या मंदिरात ठेवल्यास मुलगा वाचेल, असा सल्ला गावातल्या काही मंडळींनी दिला.

जोपर्यंत विष उतरत नाही तोपर्यंत घंटानाद सुरू ठेेवा, आरती उतरवा, असं सर्पदंश झालेल्या तरूणाच्या वडिलांना सांगण्यात आलं. मात्र, काही वेळानंतर तरूणाला खुप त्रास जाणवू लागला. मुलाच्या डोळ्यात अंधाऱ्या येत होत्या. जीभ जड झाली होती. शरीर निळं पडलं होत. मुलाच्या तोंडातून फेस येत होता. त्यानंतर तरूणाला हाॅस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, उशीर झाल्यामुळे विष मुलाच्या पुर्ण शरिरात भिनलं होतं. तरूणाच्या वडिलांनी हंबरडा फोडला. अखेर उशीर झाल्यामुळे तरूणाचा जीव गेला होता.

दरम्यान, नाग चावल्यानंतर जगण्याचे तीन तास शिल्लक असतात. पहिला एक तास उपचार करण्यासाठी आणि उरलेले दोन तास प्रतिविषाचे उपचार करून जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातात. देव-देव, अंगारा, धुप, करत बसलात तर जगण्याची आशा राहत नाही, असं महेश थेटे यांनी सांगितलं आहे. सदर घटनेत अंधश्रद्धा बाळगल्यामुळे एक बळी मात्र गेला आहे.

थोडक्यात बातम्या- 

उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! प्रियंका गांधींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अन् चक्क डेव्हिड वार्नरने केला रोहित शर्मावर चोरीचा आरोप!

‘जाऊ तिथं खाऊ आणि चोर चोर मावसभाऊ’; सदाभाऊ कडाडले

अयोध्या दौऱ्यानंतर भाजप-मनसे युतीची शक्यता; राज ठाकरेंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

‘मी राजीनामा देतोय पण, माझं मन…’; बाबुल सुप्रियोंच्या सेकंड इनिंगची सुरूवात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More