बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना, डेंग्यूनंतर ‘या’ साथीचा धोका; अचानक रूग्णसंख्या वाढल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क

नागपूर | गेली दीड वर्ष झालं राज्यावरील कोरोना महामारीच्या संकटानं राज्यांचं मोठं नुकसान केलं आहे. अजूनही कोरोनाचा प्रादूूर्भाव कमी झाला नाही. कोरोना रोगाची तिसरी लाट येण्याच्या भीतीनं राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. यातच आता विदर्भात स्वाईन फ्लूचे रूग्ण वाढल्यानं राज्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

नागपूर विभागात स्वाईन फ्लूचे 6 रूग्ण आढळल्यानं प्रशासनानं काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. कोरोना, म्युकरोमायसिस, डेंग्यू आणि आता स्वाईन फ्लू या रोगांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील तणाव वाढलेला आहे. कोरोना रोगानं विदर्भातील नागपूर विभागात मोठं थैमान घातलं असताना आता स्वाईन फ्लू आल्यानं नागरिकांना आरोग्याबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज आहे.

सहा रूग्णापैकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. या रूग्णाच्या मृत्यू हा भंडारा जिल्ह्यातील आहे. या रूग्णाचा अंतिम अहवाल आल्यानंतरच अधिक सांगता येईल, स्थानिक आरोग्य यंत्रणेन कळवलं आहे. नागपूर भागातील सर्व जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत रूग्णांच्या तपासण्या चालू आहेत.

दरम्यान, आधीच कोरोनानं बेजार झालेल्या नागरिकांना आता स्वाई फ्लूला तोंड द्यावं लागणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयाच्या माहितीनूसार नागपूर विभागात 6 रूग्णसंख्या आढळल्याचं सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या 

नितीन गडकरी हे केंद्रातील सर्वात लोकप्रिय नेते – सुप्रिया सुळे

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा – जयंत पाटील

किरीट सोमय्यांबाबत त्यादिवशी जे घडलं ते चुकीचंच होतं – अजित पवार

मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून राज्यातील मंदिरं उघडणार; मुख्यमंत्र्यांकडून सुधारित आदेश जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More