#Video | वादात सापडलेल्या ‘न्यूड’चा टीझर प्रदर्शित

मुंबई | गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून वगळलेल्या रवी जाधवच्या ‘न्यूड’ सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आलाय. सध्या सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा टीझर रिलीज झालाय. 

परिक्षकांनी इंडियन पॅनोरमा विभागातून ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ या सिनेमाची निवड केली होती. मात्र केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ऐनवेळी दोन्ही सिनेमे इफ्फीतून वगळले. यासंदर्भात ठोस कारणही अद्याप देण्यात आलेलं नाही, त्यामुळे सिनेसृष्टीतून संताप व्यक्त करण्यात येतोय. 

अखेर दिग्दर्शक रवी जाधव यांनी या सिनेमाचा टीझर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कारण प्रथमदर्शनी तरी या सिनेमात काही आक्षेपार्ह दिसत नाहीये. 

पाहा या सिनेमाचा टीझर-