मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेता सुशांत सिंहने आत्महत्या केल्यापासून कंगणा राणावतने बॉलिवूडवर आरोप केले होते. हाथरसमधील घटना असो की मुंबईतील तिच्या ऑफिसवर शिवसेनेने केलेली कारवाई अशा अनेक मुद्यांमुळे कंगणा चर्चेत होती.
कंगणाने तेव्हा केलेल्या आरोपामुळे कंगणा लोकांच्या पसंतीस उतरत होती. मात्र त्यानंतर कंगणा प्रत्येक गोष्टीवर आपलं मत व्यक्त करायला लागली. म्हणजे पहिल्यापेक्षा कंगणा आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेली पाहायला मिळते. आताही तिने दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनामधील आजी दिवसाच्या रोजावर उपलब्ध असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
कंगणावर सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली. अशातच कंगणाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये कंगणाने ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये आली होती. ‘रंगून’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगणा आणि अभिनेता शाहिद कपूर दोघे आले होते. त्यावेळी कंगणाला कपिल शर्माने विचारलं की, तुम्ही सोशल मीडिया का वापरत नाही?
यावर कंगणा उत्तर देताना म्हणाली की, मला वाटतं की ज्या लोकांना काही काम नसतं ते सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असतात. जे लोक रिकामटेकडे असतात तेच पोस्ट करतात. त्यांना काही काम नसतं म्हणून ते लोक सोशल मीडियावर टाईमपास करतात. कंगणाचा हा व्हिडीओ एका युजरने एडिट केला असून तो चांगलाच व्हायरल झालेला दिसत आहे.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या-
‘मिळालेला मंत्रिपदाचा तुकडा जपण्यासाठी बच्चू कडू…’; भाजपची मंत्री कडूंवर जहरी टाका
“पवारांचा कृषी कायद्यांच्या मूलतत्त्वांना विरोध नाही काही जण वाहत्या गंगेत हात धुताहेत”
“भाजपसोबत राहिलो असतो तर मुख्यमंत्री असतो, काँग्रेसमुळे सगळं संपलं”
“ज्या तख्तावर तुम्ही बसले आहात ते तख्त शेतकरी बदलून टाकतील”
भाजपच्या ‘या’ नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत केला प्रवेश
Comments are closed.