बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गर्भवती महिलेला स्ट्रेचर न मिळाल्याने धडपड करणाऱ्या डाॅक्टरांचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सध्या माणुसकी संपत चाल्याचं अनेक घटनांनमधून दिसून येत आहे. मात्र हरियाणामधील एका रुग्णालयात माणुसकी जिवंत असल्याचं एक जागतं उदाहरण समोर आलं आहे. गर्भवती महिला वेदनेनं तडफडत असताना तिला स्ट्रेचर न मिळाल्यामुळे स्वतः डाॅक्टरांनी धाव घेत तिला वाचवण्यासाठी धडपड केली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित गर्भवती महिलेचं नाव सोनिया असं आहे. सोनिया ही उत्तर प्रदेशमधील बांदा येथील रहिवासी असून ती विटभट्टीवर काम करते. सोनिया आठ महिन्यांची गर्भवती होती. तिला वेदन्या चालू झाल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र स्ट्रेचर नसल्यामुळे ती अॅम्ब्यूलन्समध्ये तडफत होती. अशातच सिव्हिल हाॅस्पिटलचे डेप्यूटी सिव्हिल सर्जन डाॅ. रमेश पंचाल यांनी हे चित्र पहाताच सोनियाला उचलून वार्डमध्ये नेलं. तेव्हा कर्मचारी स्ट्रेचर घेऊन आला.

सोनियाचं वय 38 वर्ष होतं. डाॅक्टरांनी तिला वाचवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मात्र उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाला. काही दिवसांपुर्वी देखील सोनियाला रुग्णालयात आणण्यात आलं होतं. मात्र उपचार पुर्ण होण्यापुर्वीच तिला घरी नेलं. सोमवारी तब्येत बिघडल्यामुळे तिला पुन्हा रुग्णालयात आण्यात आलं होतं तेव्हा ती प्रचंड अशक्त होती. मात्र रुग्णालयात 110 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण असल्यामुळे स्ट्रेचर नसल्याचं सिव्हिल हाॅस्पिटलचे एसएमओ डाॅ. गोपाल गोयाल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ काँग्रेसचे खासदार दीपेंद्र हुड्डा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच कोण म्हणतं माणुसकी संपली आहे?, असा प्रश्न त्यांनी या केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून 61 हाजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

थोडक्यात बातम्या-

लायकी काढत चक्क नर्सने लगावली डाॅक्टरांच्या कानशिलात, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

“लोकांना हॅास्पिटलमध्ये बेड मिळेनात मग संघमालक, सरकार IPLवर प्रचंड पैसा का खर्च करतंय”

खेळ महत्त्वाचा नाही! 30 ॲास्ट्रेलियन खेळाडूंचा आयपीएलबद्दल मोठा निर्णय

धक्कादायक! पोलिसाच्या नावे बनावट अकाऊंट उघडुन ढोंग करत मागितली ‘एवढी’ रक्कम

पेटीएमची मोठी मदत, भारताला ‘इतके’ हजार ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर देणार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More