बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

20 फुटाच्या चेंबरमध्ये पडल्यानंतर तरुण 25 सेकंदात दुसऱ्या चेंबरमधून बाहेर, पाहा व्हिडीओ

औरंगाबाद | मागील आठवड्यापासून औरंगाबाद येथे जोरदार पावसाने लोकांना हैराण करुन सोडलं आहे. या पावसाने नदी, नाले सर्व काही भरभरुन वाहू लागले आहेत. अशातच एक तरुण भरलेल्या चेंबरमध्ये वाहून जात असताना तो अवघ्या 25 सेकंदातच दुसऱ्या चेंबरमधून बाहेर आला. याबाबतचा एक व्हिडीओ देखील समोर आला असून हा तरुण मरता-मरता वाचल्याचं दिसून येत आहे.

संबंधित तरुणाचं नाव मोरेश सुळ असं आहे. मोरेश हा केवळ 18 वर्षांचा असून तो औरंगाबाद येथील भवानी नगर येथील रहिवासी आहे.
काल रात्री परिसरात जोरदार पाऊस आल्याने मोरेश हा मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात भरलेल्या चेंबरमध्ये पडला. नशिबाने वाहत्या पाण्याच्या प्रवाहाने तो दुसऱ्या चेंबरमधून बाहेर आला.

मुसळधार पावसामध्ये चेंबरला नदीचं रूप आलं होतं. मोरेश ज्या चेंबरमध्ये पडला तो चेंबर तब्बल २० फूटांचा होता. तर त्या चेंबरमधून केवळ 25 सेकंदात मोरेश दुसऱ्या चेंबरमधून बाहेर आला.

दरम्यान, मोरेशच्या या प्रसंगाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून हा व्हिडीओ कोणाच्याही काळजाचा ठोका चुकवेल. काही दिवसांपुर्वी एक ओली बाळंतीन देखील तिच्या पाच दिवसांच्या बाळासोबत ओढ्यात अडकली होती. मात्र त्यानंतर एका माऊलीने देवमाणूस बनून आई आणि तिच्या बाळाला वाचवलं.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

महात्मा गांधींच्या पणतीला न्यायालयानं ‘या’ गुन्ह्यांतर्गत सुनावली 7 वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा

अबब! अन् तिने चक्क साडीवरच सिलिंडर उचलून केला वर्कआऊट; व्हिडीओ तुफान व्हायरल

“अजित पवार चिरीमिरी खात नाही. संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?”

मोठी बातमी! नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात; जात प्रमाणपत्र न्यायालयाने केलं रद्द

कबीर सिंगच्या प्रितीचा हाॅट अंडरवाॅटर व्हिडीओ तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More