बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंदिरात पुजाऱ्यासोबत होती महिला त्यानंतर….; गावकऱ्यांनी व्हिडीओ काढत केली मारहाण

नवी दिल्ली | मंदिरात पुजाऱ्यासोबत कथित अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी व्हिडीओ काढत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. चित्तोडगड जिल्ह्यातील गंगरार पोलीस स्टेशनच्या परिसरात असणाऱ्या मंदिरातील ही घटना आहे. 30 जुलैला सरनेश्वर महादेव मंदिरात एक महिला ओसरा पुजाऱ्यासोबत होती त्यानंतर तेथील लोकांनी त्यांचे अनैतिक संबंध असल्याचं आरोप करत त्यांना मारहाण केली आहे.

संबंधित महिलेने पोलीस अधीक्षक राजेंद्र प्रसाद गोयल यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेने सांगितलं की, आमचे आणि पुजाऱ्याच्या घरच्यांचे चांगले संबंध आहेत. त्यावेळी मंदिरात पुजाऱ्यांच्या पत्नीसोबत पूजा करायची होती त्यावेळी पुजारीने मला खोलीमध्ये थांबण्यास सांगितलं आणि ते त्यांच्या पत्नीला आणायला गेले.

मात्र पुजारी आले तेव्हा त्यांच्यासोबत काही लोक आली आणि त्यांनी पुजारींना मारायला सुरूवात केली. मला खोलीत बंद करून मारहाण केली. काहींनी माझे कपडे ओढण्याचा प्रयत्न केला, असं पीडित महिलेने सांगितलं आहे. ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला आहे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. पीडित महिला मंगळवारी पोलीस अधीक्षकांसमोर हजर झाल्याची माहिती समजत आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे माझ्या कुंटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. माझे पती चांगल्या पदावर कामाला आहेत. पीडितेने 6 ते 7 जणांची नाव घेतली आहेत. मला जर न्याय मिळाला नाही तर  पोलीस अधीक्षक कार्यालयात बसून कारवाईची वाट पाहणार असल्याचं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

राहुल, जडेजाने ठोकलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताकडे ‘इतक्या’ धावांची आघाडी, अँडरसन आणि रॉबिनसनची भेदक गोलंदाजी!

बुलेटवर कपल करत होतं अश्लील चाळे त्यानंतर गावकऱ्यांनी गाडी अडवुन…पाहा व्हिडीओ!

पुणे मेट्रोवरुन भाजप-राष्ट्रवादीत वाद पेटला! आता फडणवीस मेट्रोची पाहणी करणार

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यात आज नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त!

अकरावी सीईटीवर न्यायालयाची सुनावणी, ‘या’ तारखेला विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More